बीएड सीईटी परीक्षा

परभणीतील एमजीएम सेंटर मध्ये शॉर्टसर्किटमुळे बीएड सीईटी परीक्षा रद्द...?

BEd CET Exam: परभणीतील एमजीएम सेंटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे बीएड सीईटी परीक्षा रद्द झाली. २९० विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला, पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली.

परभणीतील एमजीएम सेंटर मध्ये शॉर्टसर्किटमुळे बीएड सीईटी परीक्षा रद्द...?

BEd CET Exam

 विद्यार्थ्यांना मनस्ताप; पुन्हा परीक्षा घेण्याची प्रशासनाकडे मागणी

परभणी (BEd CET Exam) : येथील  एमआयडीसी परिसरात असलेल्या एमजीएम सेंटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आज शुक्रवार २७ मार्च रोजी होणारी बीएड सीईटी परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे २९० विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

शहरातील एमजीएम सेंटरवर आज बीएड सिईटी परीक्षा (BEd CET Exam) महाराष्ट्र राज्य सीईटी सेल कडून घेण्यात येणार होती या परीक्षेसाठी जवळपास २९० विद्यार्थी हजर झाले. सकाळी साडेनऊ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना अकरा वाजले तरी प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे ताटकळत बसलेल्या विद्यार्थ्यांनी याचे कारण सेंटर वाल्याना विचारले असता, शॉर्टसर्किट झाले आहे. कम्प्युटर सुरू होणार नाहीत त्यामुळे परीक्षा होणार नाही. असे सांगण्यात आले.

यावेळी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, विवाहित महिला यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. परीक्षा रद्द झाल्यामुळे वर्ष वाया जाणार तसेच परीक्षा फॉर्म भरण्याचा पंधराशे रुपये तसेच शंभर ते दोनशे किलोमीटर वरून सेंटरवर येण्यासाठी लागलेला आर्थिक भार, त्यातच पेट्रोल, डिझेल तुटवडा यामुळे परीक्षार्थींना अनेक समस्यांचा सामना करत सेंटर गाठावे लागले. त्यामुळे पुन्हा परीक्षा घ्यावी, तसेच विनाकारण बसलेला भुर्दंड भरून द्यावा तसेच गैरसोयीला सीईटी सेलला दोषी ठरवावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान सेंटर वरील नियंत्रकाने परीक्षा रद्द झाल्याची जाहीर केले. याबाबत सीईटी सेलला कळविले असून परीक्षा पुन्हा घेण्याची विनंती केली असल्याचे सांगितले आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026