नीट परीक्षा रद्द

परभणीत नीट परीक्षा रद्द; पेपर फुटीच्या शक्यतेमुळे निर्णय

NEET Exam Cancelled: परभणीत ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपर फुटीच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आली; ४ हजार १९८ विद्यार्थ्यांची परीक्षा प्रभावित.

परभणीत नीट परीक्षा रद्द; पेपर फुटीच्या शक्यतेमुळे निर्णय

NEET Exam Cancelled

 

नवीन तारीख नंतर जाहीर होणार; ४ हजार १९८ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

परभणी (NEET Exam Cancelled) : राष्ट्रीय चाचणी संस्थेने ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द केली आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे एनटीएने म्हटले आहे. एनटीए ने सांगितले की, नीट यूजी परीक्षा संदर्भात रविवार १० मे रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. आता या संस्थेने पालक आणि जनतेला काही नवीन निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. पूर्वीची परीक्षा केंद्रे तीच राहतील. पुनरपरीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्रे जारी केले जातील.

याशिवाय विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले जाईल. परीक्षा निष्पक्ष आणि सुरक्षित करता यावी, यासाठी या (NEET Exam Cancelled) प्रकरणाशी संबंधित काही तपास ८ मे रोजी केंद्रीय यंत्रणाकडे देण्यात आले होते. आता तपास यंत्रणा कडून मिळालेल्या माहितीच्या आणि शासकीय मंजुरीच्या आधारे, एनटीएने ३मे रोजी झालेली नीट युजी परीक्षा रद्द करून  तिचे पुनर्नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील.

तपास यंत्रणाच्या निष्कर्षानुसार, सध्याची तपास प्रक्रिया पुढे चालू ठेवता येणार नाही असे निश्चित झाले आहे. त्यामुळे पारदर्शकता राखण्यासाठी तपास पुन्हा करण्यात येईल. नीट युजी परीक्षा ३ मे रोजी देशभरात घेण्यात आली. (NEET Exam Cancelled) परीक्षेची प्रश्नपत्रिका वेळेपूर्वीच फुटल्याचा संशय आहे. यात परभणी शहरातील ४ हजार १९८ विद्यार्थ्यांनी ११ परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली होती.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026