शेलुबाजार (Secondary Mineral Theft) : मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कंझरा येथील तत्कालीन आणि तन्हाळा येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक प्रमोद एम. पिंपळकर यांनी गौण खनिज चोरी केल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांच्यावर (Secondary Mineral Theft) गोंन खनिज चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माजी सभापती बंडूभाऊ वैद्य यांनी जिल्हाधिकार्याला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
तहसिलदार मंगरुळपीर यांनी तलाठी, मंडळ अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग मंगरुळपीर यांचे मार्फत चौकशी करुन त्यांच्याकडून झालेल्या प्राप्त अहवालानुसार प्रमोद एम. पिंपळकर यांनीच (Secondary Mineral Theft) गौण खनिज चोरी केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायत कंझरा येथील प्रकरणात रु.३०७२५०/- आणि तहर्हाळा येथील गौण खनिज चोरी प्रकरणात रु.३०००००/-असा एकूण ६०७२५०/- (अक्षरी सहा लाख सात हजार दोनशे पन्नास रुपये) शासनखाती जमा करण्याचे आदेश तहसिलदार मंगरुळपीर यांनी पत्राद्वारे दिले आहे.असे असतांनाही ग्रामसेवक प्रमोद एम. पिंपळकर यांनी आजपर्यंतही तो दंड भरलेला नाही.
भारतीय न्यायसंहिता २०२३ नुसार त्यांच्यावरती (Secondary Mineral Theft) गौण खनिज चोरी केल्याचा गुन्हा सिद्ध झालेला असून चोरी करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने त्यांचेवर कायाद्याप्रमाणे फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावा, अशी मागणी पंचायत समितीची माजी सभापती बूंड वैद्य यांनी निवेदनाव्दारे केली आहे.