रेल्वेमध्ये मारहाण करत केली होती हत्या
वर्धा (Woman murder Case) : कानपूर येथे फेरीवर गेलेल्या महिलांनी सहकारी महिलेस मारहाण केल्याने मृत्यू झाला. परत येताना ही घटना घडली होती. पाच महिन्यांनंतर या गंभीर घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी (Woman murder Case) नऊ महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव शोभा हातगडे (३०) रा. आनंदनगर असे असल्याचे सांगण्यात आले. मृत शोभा हातगडे तसेच प्रीती अनिल लोंढे, मालता शक्ती शेंडे, लता जीवन लोंढे, सोनम उर्फ सुनीता सागर लोंढे, काजल विनोद खपसरे, रेणू मायकल, रेश्मा हातागडे, सोनी विनय शेंडे, सुनीता सावन लोंढे सर्व आनंद नगर याच्यासह कानपूरला चोरीकरिता फेरीवर गेल्या होत्या.
प्रवासादरम्यान शोभा हिला सोन्याचे दागिने मिळाल्याने सहकारी महिलांनी शोभाला दागिन्यांबद्दल सांगण्यास सांगितले. दागीने दाखवण्यास नकार दिल्याने महिलांनी तिला बेदम मारहाण केली. यात शोभाचा मृत्यू झाला. (Woman murder Case) पाच महिन्यांच्या तपासांती प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी संजय हातागडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी नऊ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ८ महिलांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.