शहरातील वसमत रोडवरील घटना!
परभणी (Crime Case) : दुचाकीवरुन जात असलेल्या एका इसमाला थांबवून त्याला कारमध्ये उचलून नेण्यात आल्याची घटना गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास वसमत रोडवरील बी. रघुनाथ सभागृहासमोर घडली. सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून कारचा शोध सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, नवा मोंढा पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
पोलिसांचा तपास सुरू!
या घटनेबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दुचाकीवरुन जात असलेल्या एका इसमाला कारमध्ये टाकून बळजबरी उचलून नेण्यात आले आहे. वसमत रोडवरील बी. रघुनाथ सभागृहा समोर दिवसाढवळ्या ही घटना घडली. या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेर्याच्या फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला आहे. काही संशयीतांना बोलवून त्यांची चौकशी देखील करण्यात येत आहे. सदर इसमाला उचलून नेण्याच्या मागे मालमत्तेचा विक्रीचा व्यवहार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नेमकी ही घटना कशी घडली, घटने मागील कारण काय हे सदर इसम आणि त्याला उचलून नेणारे व्यक्ती मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल. घटनेची गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळ न दडवता तपास सुरू केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, स्थागुशाचे पोनि. विवेकानंद पाटील आणि त्यांच्या पथकाने नवा मोंढा पोलीस ठाण्यात भेट दिली. घटने मागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
