परभणी (Parbhani):- धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेल्या एकाचे घर फोडत चोरट्यांनी रोख रक्कम आणि चांदीचे दागिणे मिळून ७३ हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना परभणी शहरातील भिमा कोरेगावनगर, धाररोड येथे उघडकीस आली. अमोल वाकोडे यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून तीन हजार रूपये किंमतीचे चांदीचे दागिणे (Silver)आणि ७० हजार रोकड लंपास केली. नानलपेठ पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.