तिघांविरुद्ध अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल!
परभणी (Casteist Abuse) : परभणीच्या गंगाखेड येथील घरासमोरील सार्वजनिक बोळ झाडून कचरा आमच्या घरासमोर का टाकला असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून अपमानीत करणाऱ्या तीन महिलांविरुद्ध मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारित्र्यावर शिंतोडे उडवत अपमानीत केल्याची फिर्याद!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील रोशन मोहल्ला परिसरात शिक्षणासाठी माहेरी राहत असलेल्या भाग्यशाली संदिप वाकळे वय ३३ वर्ष यांच्या आईने मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी घरासमोरील सार्वजनिक बोळ झाडून त्या नांदेड येथे गेल्या असता सकाळी ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्यांची बहीण घरात असतांना शेजारी राहणाऱ्या कुसुम भागवत सलगर व त्यांच्या दोन मुली मनिषा दिपक बंडगर आणि अश्विनी भागवत सलगर यांनी सार्वजनिक बोळ झाडून कचरा आमच्या घरासमोर का टाकला असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली तेंव्हा काकू तुम्ही आम्हाला शिवीगाळ का करता असे फिर्यादीने म्हणताच मनिषा दिपक बंडगर हिने जातीवर नको ते बोलून चारित्र्यावर शिंतोडे उडवत अपमानीत केल्याची फिर्याद भाग्यशाली संदिप वाकळे यांनी दिल्यावरून मंगळवार रोजी रात्री उशिराने वरील तिघांविरुद्ध (अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक आधिनियमाच्या विविध कलमान्वये) अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे हे करीत आहेत.