महाराष्ट्र शासनाच्या प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी 46 गोवंशाची केली सुटका!
जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तालुक्यातील गो तस्करी बंद करण्यासाठी भाजपने केला होता पुढाकार पण स्थानिक पोलिसांना फिरवली पाठ!
कोरची (Cattle Smuggling) : उत्तर गडचिरोलीकडील नक्षलवाद संपुष्टात येतात पोलिसांच्या मुख्य संमतीने कोरची तालुक्यातील बोरी, कोसमी नंबर दोन, हितापाळी घुगवा हेटाळकसा, बोटेकसा मिसपीरी भागातून गो तस्करीचा मुख्य अड्डा कोरची तालुका झाला असून, कोरची पोलिस स्टेशन (Korchi Police Station) बेडगाव पोलीस मदत केंद्र व कोडगुल पोलिस स्टेशन येथील पोलीसांची मुख्य संमतीशिवाय गो तस्करी सुरू राहू शकत नाही. अशी गोप्रेमीची भावना आहे. त्या परिसरात गो तस्करीचे अड्डे खुलेआम सुरू असून, याबाबत पोलिसांना माहिती दिली असता, पोलीस नक्षल ची भीती दाखवून सामान्य नागरिकांना घडवण्याचे काम करतात. पण याबद्दल तक्रार केल्यास गो तस्करांना लगेच पोलिसांकडून माहिती दिली जाते. अशी नागरिकांची ओरड सुरू आहे. त्यामुळे गो तस्करीवर आल्या घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. अशी गोप्रेमीनी मागणी केलेली आहे.
बेडगाव पोलिसांनी नक्षल यांची भीती दाखवून प्राणी कल्याण समिती अधिकाऱ्यांना मदत करण्यास दिला नकार!
मुंबई मंत्रालय चे मुख्यमंत्री CMO कार्यालय मधील अमर कलमकरजी साहेब,गडचिरोली समन्वयक जिल्हाध्यक्ष हेमंतजी राठी, रमेशजी पुरोहित, adv राजूजी गुप्ता, कमलेशजी शाह आणि इतर सर्व मुंबई मंत्रालय पदाधिकाऱ्यांनी स्थानीय गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) SP, DYSP, पोलीस निरीक्षक बेडगांवला फोन करून माहिती दिल्यावर सुद्धा अवैध गौवंश तस्करीचा खुलासा न करने आणि कोणतीही कारवाई न करने हे संपूर्ण पोलीस प्रशासनचा कार्याला प्रश्नचिन्ह झालेले आहे. स्थानीय नागरिकचा गौवंश तस्करीला विरोध असून, सुद्धा अवैध धंधे पोलीसचा मदतीने चालू आहे. नक्षलवादी क्षेत्र म्हणुन पोलीस पूर्ण ईमानदारी ने कार्य करित नाही अश्या गैर जिम्मेदार पोलीस अधिकारी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
तालुक्यातील बोरी, कोटरा, कोसमी नंबर 2 मधुन होते दररोज प्रत्येक ठिकाणावरून दो ट्रक गो तस्करी!
17 ऑगस्टला गुप्त मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव पोलीस मदत केंद्रात जाऊन बोरी येथे गो तस्करांनी जमा करून ठेवलेल्या जनावरांना सुटका करण्यासाठी मदत मागितली असता, नक्षलवाद्यांची भीती झाड दाखवून त्या ठिकाणी येण्यास पोलिसांनी नकार दिला. तरीही गावकऱ्यांच्या मदतीने गो तस्करांच्या 46 जनावरांची जंगलात मुक्त सुटका करून दिली.