कम्प्युटर यंत्रणा बंद, व्यवहार ठप्प असल्याकारणाने बँक खातेदारांना आल्यापावली वापस परत जावे लागले!
फाळेगाव (Central Bank) : फाळेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक (District Central Bank) शाखेत संगणकाच्या सिस्टीम मध्ये काहीतरी बिघाड झाल्याने सोमवार 11 ऑगस्ट रोजी सकाळपासून बँकेचा व्यवहार ठप्प असल्याने खातेदारांची गैरसोय झाली. ‘दि परभणी हिंगोली मध्यवर्ती सहकारी बँक शाखा फाळेगाव’ या बँकेत नेहमीप्रमाणे कर्मचारी कर्तव्यावर असताना, संगणकाच्या सिस्टीम मध्ये मोठा आवाज झाला. त्यामुळे संपूर्ण संगणक यंत्रणा काम करत नसल्याने व्यवहार बंद होता. दरम्यान, किसान सन्मान योजनेचे, लाडके बहीण व इतर लाभार्थी रोख रकमेसाठी बँकेत आले असता, संगणकाच्या कुठल्या तरी सिस्टीम मध्ये मोठा आवाज आला. त्यामुळे कम्प्युटर यंत्रणा बंद झाली. त्यामुळे व्यवहार ठप्प असल्याकारणाने बँक खातेदारांना आल्यापावली वापस परत जावे लागले. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय झाली.
“संगणक प्रोग्राम सिस्टीम मध्ये बिघाड झाल्याचे वरिष्ठांना कळविण्यात आले आहे संचामध्ये दुरुस्ती करणारे आल्यानंतर बँक सेवा पूर्ववत होईल. एस. पी. खिलारी शाखाधिकारी ‘दि परभणी मध्यवर्ती सहकारी बँक शाखा फाळेगाव”