अज्ञात चोरट्यावर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
परभणी (Chain Snatching) : परभणीच्या मानवत येथील रुग्णालयासाठी परभणीला येत असलेल्या एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बस प्रवासात अज्ञाताने लंपास केले. ही घटना मानवत बसस्थानक (Manavat Bus Stand) आल्यावर उघडकीस आली. सदर प्रकरणी २६ ऑगस्टला अज्ञात चोरट्यावर मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबासाहेब धोपटे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी यांची पत्नी मंगलबाई ह्या आष्टी ते उमरखेड बसने परभणी येथे डोळ्याच्या दवाखान्यात येत होत्या. बस प्रवासात अज्ञात चोरट्याने मंगलबाई यांच्या गळ्यातील १२ ग्राम वजनाचे ६० हजार रुपये किंमतीचे मणि व डोरले लंपास केले. परभणी येथे बसमधून उतरल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी मानवत पोलिसात (Manawat Police) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. शेख करत आहेत.
आखाड्यावरुन ६० हजाराचे पशुधन लंपास!
पाथरी : शेत आखाड्यावर बांधलेले ६० हजार रुपये किंमतीचे पशुधन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील कोळसेवाडी कासापुरी शिवारात उघडकीस आली. संतोष कोरडे यांच्या तक्रारीवरुन पाथरी पोलिसात (Pathari Police) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. चोरट्याने शेत आखाड्यावरुन शेळ्या चोरुन नेल्या आहेत. तपास पोह. हातागळे करत आहेत.