देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chaitra Padwa Pahat: बुलढाणेकरांची पाडवा पहाट ठरली मंगलमय
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Chaitra Padwa Pahat: बुलढाणेकरांची पाडवा पहाट ठरली मंगलमय
अध्यात्मबुलडाणाविदर्भ

Chaitra Padwa Pahat: बुलढाणेकरांची पाडवा पहाट ठरली मंगलमय

Deshonnati Digital
Last updated: 2025/03/31 at 4:57 PM
By Deshonnati Digital Published March 31, 2025
Share

राजेश दुतंडे व वाचस्पती चंदेल यांच्या सप्तसुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

बुलढाणा (Chaitra Padwa Pahat) : मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी वसंतलक्ष्मी एज्युकेशनल अँड मल्टिपर्पज फाउंडेशन या संस्थेद्वारे आयोजित केलेल्या ‘चैत्र पाडवा पहाट’ (Chaitra Padwa Pahat) या कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सुप्रसिद्ध गायक राजेश दुतंडे व वाचस्पती चंदेल यांच्या संचाने सुमधुर गीतांचे सादरीकरण करुन बुलढाणेकरांची पाडवा पहाट प्रसन्न व संस्मरणीय केली.

येथील वसंतलक्ष्मी एज्युकेशनल अँड मल्टिपर्पज फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष तुषार मोहन काचकुरे व नाट्यकर्मी पवन बाबरेकर हे मागील दोन वर्षांपासून चैत्र पाडवा पहाट (Chaitra Padwa Pahat) या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. यंदा ३० मार्च रोजी एडेड हायस्कूलच्या प्रांगणात पहाटे साडेपाच वाजता सुप्रसिध्द गायक राजेश दुतंडे व गायिका वाचस्पती चंदेल यांचा ‘प्रभाती सूर नभी रंगती’ हा सुमधूर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याहस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

Chaitra Padwa Pahat
यानंतर रंगलेल्या संगीत मैफलीत एकाहून एक सुंदर भावभक्ती गीते, गझल व मराठी चित्रपट गिते सादर करण्यात आली. राजेश दुतंडे यांनी सादर केलेले विठ्ठल नामाचा रे टाहो.. या भक्तीगीताला आणि वाचस्पती चंदेल यांनी सादर केलेल्या केव्हा तरी पहाटे या (Chaitra Padwa Pahat) गझलेला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. निवेदक चंद्रशेखर जोशी यांनी सादर केलेले “वासुदेव आला रे वासुदेव आला” हे गीत व त्यावर आनंद संचेती यांनी सादर केलेले वासुदेवाच्या वेशभूषेतील नृत्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल तीन तास ही सुरांची मैफल रसिकांनी अनुभवली. दरम्यान स्थानिकांपैकी जेष्ठ गायक अनंताभाऊ देशपांडे यांनीही अप्रतिम गीत सादर केले.

कार्यक्रमाच्या मध्यंतरात गायक राजेश दुतंडे, गायिका वाचस्पती चंदेल, यांच्यासह वाद्यवृंदातील बासरीवादक आशिष उमाळे, ऑक्टोपॅड गणेश भालतिलक, सिंथेसाईजर श्रीकांत ढवळे, तबला वादक गजानन जवंजाळ , मृदंग वादक माधव आंधळे, ध्वनी संयोजक बजरंगभाऊ, निवेदक चंद्रशेखर जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Chaitra Padwa Pahat
कार्यक्रमाचा समारोप शाहीर सज्जनसिंग राजपूत यांच्या महाराष्ट्र गीताने करण्यात आला. पवन बाबरेकर यांनी केलेली कलात्मक नेपथ्य रचना, सेल्फी पाॅईंट, अंजली परांजपे यांनी विवेक शलाका या दैनंदिनीचे सर्व रसिकांना केलेले मोफत वितरण व सतीश रदाळ यांनी रसिकांना दिलेला कुल्हडमधील विशिष्ट चवीचा नागोरी चहा हे या कार्यक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले. (Chaitra Padwa Pahat) प्रास्ताविकातून तुषार काचकुरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली व प्रचंड अशा उपस्थितीबद्दल रसिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

सूत्रसंचालन शशिकांत इंगळे यांनी केले तर डॉ. स्वप्नील दांदडे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी रविकिरण टाकळकर, दिनेश पाटील, राहुल चव्हाण, श्रीराम पुराणिक, लक्ष्मीकांत गोंदकर, पंजाबराव आखाडे, गणेश बंगाळे, विजय सोनोने, प्रसाद दामले, जयंत दलाल, गणेश राणे, योगेश बांगडभट्टी, पराग काचकुरे, रणजित राजपूत अभिलश चोबे यांनी परीश्रम घेतले.

कार्यक्रमाला जयश्रीताई शेळके, एडेड हायस्कुलचे संचालक बाबासाहेब महाजन, तुषार महाजन यांच्यासह अरविंद टाकळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, मुख्याधिकारी गणेश पांडे, डॉ. गणेश गायकवाड, उद्योजक राजेश देशलहरा, डॉ. गजेंद्र निकम, पत्रकार राजेंद्र काळे, अरुण जैन, राजेश डिडोळकर, डॉ. अशोक भवटे, डॉ. सुभाष जोशी, सौ. अंजली परांजपे, डॉ. माधवी जवरे, सुरेखा खोत, सौ. अर्चना देव, डॉ. आशिष खासबागे, डॉ. अस्मिता चिंचोले, शाहिनाताई पठाण, डॉ. अर्चना वानेरे, प्रज्ञाताई लांजेवार, डॉ. मधुकर देवकर, डॉ. राहुल भालेकर, डॉ. गोफणे, डॉ. गवळी, ॲड. सौ. शर्वरी तुपकर, राजेश हेलगे, अरुण दिवटे, डॉ. सुभाष जोशी, डॉ. श्रीराम जोशी, संजिवनी शेळके, नमिता सावजी, डॉ. स्मिता गोडे, संदिप वानखेडे, श्रीहरी ठोसर, स्नेहलता मानकर, डॉ. अजित शिरसाट, डॉ. राजेश्वर उबरहंडे, रवी लहाने, शीतल सोनुने, डॉ. राहुल बाहेकर, अण्णासाहेब जाधव, गजेंद्रसिंग राजपूत, प्रा. प्रकाशचंद पाठक, सौ. वैशाली राजपूत, चित्राताई हिंगणे, मिलिंद आपटे यांच्यासह बुलढाणेकर नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Aundha Nagnath: नरक चतुर्दशी निमित्त असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची अलंकार महापूजा

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

TAGGED: Chaitra Padwa Pahat
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : आरोपीसह एक कट्टा व दोन काडतूस जप्त

web editorngp web editorngp May 19, 2025
Agricultural Crops: शिंगाड्याचा कृषी पिकात अंतर्भाव, शेतकर्‍यांना दिलासा
Dharne protest: सोनपेठात मालवण घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन
Gondia : पक्ष बळकटीकरणासाठी सदस्य नोंदणी आवश्यक; सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात
Chikhli Police: चिखली: “त्या” ५ पोलिसांचे निलंबन…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Nagnath
मराठवाडाअध्यात्महिंगोली

Aundha Nagnath: नरक चतुर्दशी निमित्त असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची अलंकार महापूजा

October 20, 2025
Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?