हिंगोली (Chandu Lavhale) : अखिल भारतीय महात्मा फुले संस्था परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आ. छगन भुजबळ यांच्या आदेशान्वये आज हिंगोली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी चंदू भाऊ लव्हाळे (Chandu Lavhale) यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या संघटन वाढीसाठी व ओबीसींचा आवाज बुलंद करण्यासाठी, तळागळातील सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची हिंगोली जिल्ह्याची कार्यकारणी व संघटन मजबूत करण्यासाठी च्या सूचनाही मंत्री महोदयांनी जिल्हाध्यक्ष यांना दिले आहेत. आज हिंगोली शहराच्या वतीने चंदू लव्हाळे (Chandu Lavhale) यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी, मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, सुरेश दादा सराफ डॉ.रवी थोरात, बाळू सुर्वे, नागनाथ आप्पा नकाते, आकाश सोनटक्के, चंदू वाघ, भागवत बोधने, संतोष भुसांडे, अशोक भुसांडे, पवन मुळे, प्रभाकर जाधव, सय्यद रफिक, तुषार बनसोडे, नितीन गायकवाड, अभय मुळे, वसंत वाघ, सुमित बांगर, मधुकर राठोड, आकाश मोठे, गणेश बांगर, नागेशप्पा धनमाने,शंकर गुजरवाड, चंदू उबाळे, अक्षय सुशील कसबे , राजू लव्हाळे, प्रल्हाद चोपडे, राजू चोपडे, बालाजी सोनुने, केशवराव जांबुतकर, एल एस देवकर, सुभाषराव कदम, प्रा. राजेश गोरे, अनिकेत लव्हाळे, गणेश बोरकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.