पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू , तर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Chikhali Crime) : कौटुंबिक तसेच शेतीच्या वादातून पतीने पत्नी व तिच्या मावस भावाला भरधाव वाहनाने धडक देऊन 30 सप्टेंबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोरील चौकात जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या धडकेत गंभीर जख्मी झालेल्या पत्नीचा आज दोन सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला असून मावसभावावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत चिखली पोलिसांनी यासंदर्भात पतिविरोधात (Chikhali Crime) गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात सविता समाधान सुरडकर यांचा मावस भाऊ केशव भानुदास महाले व 48 वर्ष राहणार कव्हळा हल्ली मुक्काम श्रीकृष्ण नगर चिखली यांनी चिखली पोलिसात दिलेल्या माहितीवरून दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास केशव भानुदास महाले व त्याची मावस बहीण सविता समाधान सुरडकर हे दोघे मोटरसायकलवर बसून घराकडे जात असताना चिखली तहसील कार्यालयासमोरील चौकामध्ये आरोपी समाधान सुरडकर यांनी कौटुंबिक व कोर्टातील शेतीच्या वादातून त्याची ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून मोटरसायकल वरील तिघा जणांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धडक दिली यामध्ये सविता समाधान सुरडकर या गंभीरित्या जखमी झाल्या होत्या या घटनेनंतर त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांच्या डोक्याला व मेंदूला मोठ्या प्रमाणात मार लागल्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयातून तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज दोन सप्टेंबर रोजी सविता सुरडकर यांचा मृत्यू झाला आहे तर यामध्ये दुसरी जखमी असलेल्यावर चिखली येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिखली पोलिसांनी आरोपी समाधान धनसिंग सुरडकर रा. बेराळा ह.मु. देहु पुणे विरुद्ध अप नं.- 0733/24 कलम 109 भारतीय न्यास संहीता नुसार एक सप्टेंबर रोजीच अपघाताचा गुन्हा नोंद केला होता आता सविताच्या मृत्यूनंतर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Chikhali Crime) घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सपोनि मातोंडकर हे करित आहेत. आरोपीचा शोधार्थ पुणे, बेराळा, येवता आदी ठिकाणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे आरोपीने घटनेत वापरलेली बोलेरो कार पोलिसांना ताब्यात हवी आहे तसेच आरोपी सुद्धा हवा आहे त्यामुळे चिखली पोलीस आरोपीच्या सुद्धा कमी प्रयत्न करित आहेत.
मृतक सविता सुरडकर यांच्या मृतदेहावर छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदन करण्यात आले असून दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सवना येथे अंत्यविधी होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. अंगावर गाडी घालून जीवे मारण्यापर्यंतच्या या घटनेला घरगुती तसेच प्रॉपर्टी वादाची किनार असल्याचे बोलले जाते. समाधान सुरडकर व सविता सुरडकर मधील वादावर तोडगा निघावा किंवा प्रशासकीय पातळीवरून न्याय मिळावा यासाठी महसूल विभाग आणि पोलीस विभागाकडे यापूर्वीच तक्रारी तथा अर्ज देण्यात आले होते त्या तक्रारी व अर्जावर महसूल विभाग व पोलीस विभागाने यापूर्वी काय कारवाई केली आहे, हेही आता या घटनेनंतर पुढे यायला हवे.