बाभूळगाव () : विद्युत खांबाच्या स्टे-रोडमध्ये आलेल्या वीज प्रवाहाचा जबर धक्का लागून एका चार वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही (Electric Shock) घटना तालुक्यातील गवंडी येथे ३० जून रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. यातील मृतक मुलीचे नाव तनश्री संजय कोरटकार असे असून ती तिचे काका ताराचंद साहेबराव कोरटकार यांचेकडे राहत होती.
तनश्री संजय कोरटकार (४) हि दोन वर्षापासुन तिचे आई वडिल हे शेळी, मेंढ्या चारायला बाहेरगावी जातात त्यामुळे ताराचंद कोरटकर यांच्याजवळ रहात होती. दरम्यान ३० जून रोजी दुपारी १२.३० वा.चे दरम्यान ताराचंद यांची आई पुर्णा साहेबराव कोरटकार हिने गावामध्ये आंबे विकनारे लोकाजवळुन आंबे विकत घेतले व खाली टोपली तनश्री हि नेऊन देण्याकरीता जात असताना (Electric Shock) गावातील रंगराव बाळकृष्ण कोरटकार यांचे घरासमोरील महावितरणच्या सिमेंट पोलच्या ताराचे तंगाव्याला स्पर्श झाल्याने ती त्याला चिकटली.
पाऊस पडल्याने जमिनिला ओलावा आला असल्याने सिमेंट पोलच्या तंगाव्याला करंट आला होता. तनश्री त्या तंगाव्याला चिपकुन जागीच मरण पावली. ही घटना माहित होताच गावातील लोक त्या दिशेने धावले. (Electric Shock) घटनेची माहिती महावितरण व पोलीसांना देण्यात आली. महावितरणचे कर्मचारी येउन त्यांनी लाईन बंद केली.




