कोरपना (Chandrapur) :- शिक्षण हे वाघनीचे दूध असून ज्यांनी प्राशन केले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत असे महामानवानी म्हटले आहे खरे तर शिक्षणाची आवड, सत्य असत्य शिस्त, याची खरी शिवकन ही पहिल्या वर्गापासून प्राथमिक शिक्षणापासूनच बालकांना देऊन कोवळ्या रोपट्याला मोठ्या वृक्षाचा आकार देण्याचे काम हे शिक्षण विभागाच्या (Department of Education) माध्यमातून पवित्र शिक्षणाच्या मंदिरात होत असताना एकीकडे कोरपना तालुक्यातील औद्योगिक परिसरातील नांदा बिबी आवारपूर नोकारी या जवळपासच्या औदयोगिक गावातील पालकांनी २०२३ मध्ये जेव्हा आरटीई (RTE) मध्ये प्रवेश मिळविण्याकरिता शासनाच्या सूचनेप्रमाणाने अनेक पालकांनी वेगवेगळ्या सेतू केंद्रासह तेव्हा २०२३ मध्ये नांदफाटा येथे असलेल्या सेतू केंद्रातून अर्ज भरण्यात आले. मात्र त्यात आर्थिक गरीब वंचित घातकातील लाभार्थी बाजूला सारून २०२३ मध्ये चक्क सेतू केंद्र चालकाचा पाल्य आर टी ई मध्ये मध्ये मोफत शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आले असून आवारपुरातील ग्रामपंचायत पदाधिकारी व एका मोठ्या ठेकेदाराचा मुलगा तसेच अनेक धंनदांडग्याचे पाल्य खोटे गुगल लोकेशन टाकून आर टी ई मधून मोफत शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहेत.
खोटे गुगल लोकेशन टाकून आर टी ई तुन मोफत शिक्षण घेत असल्याचे समोर
याबाबत तत्कालीन गटशिक्षण अधिकारी कांबळे यांच्या कडे मृतक अमरीश नागरकर यांनी याची चोकशी करून कारवाई करण्याची मागणी करून अशा बोगसगिरी करून खोटे लोकेशन टाकून लाभ घेणाऱ्याचे प्रवेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे शिक्षण विभागाने प्रकरणाचे गाभीर्य जाणून न घेतल्याने व दुर्लक्षित केल्याने मागील दोन वर्षात सतत खोटे गुगल लोकेशनचा (Google location) चांगलाच बोलबाला झाला असून ज्यांचे अंतर शाळेच्या अगदी जवळ त्यांचे पहिल्याच यादीत नाव असल्याचे स्पष्ट झालेल्या यादीतून निदर्शनात आले आहेत. शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशाचा बाजार होत असल्याच्या चर्चेला आता उधाण आले आहेत, कारण गोरगरीब आर्थिक व वंचित यांच्या योजनेवर धनदांडगे आता डल्ला मारत असून शिक्षण विभागाच्या लक्षात आणून फक्त चौकशी करून कागदी घोडे नाचवीण्या व्यक्तीरिक्त थेट कारवाई होत नसल्याने खोट्या माहिती भरणाऱ्याचे पीक वाढले असून याबाबत खोटे लोकेशन बाबतचा मुख्य सूत्रधार अजून शिक्षण विभागाच्या लक्षात आला नाही हे मात्र न सुटणारे कोडे बनले असून या वर्षी २०२५ मध्ये सुद्धा गुगल लोकेशन बाबत सतत वृत्तपत्रात (News Paper) बातम्या आल्याने चौकशी केली असल्याची माहिती आहेत.
२०२५ मध्ये सुद्धा गुगल लोकेशन बाबत सतत वृत्तपत्रात बातम्या आल्याने चौकशी केली असल्याची माहिती
मात्र प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे लोकेशन शाळेच्या ग्राउंड वर, ए सी डब्लू स्पोर्ट क्लब, शाळेवजवळील जंगलात, शाळेला लागूनच हवाई अंतराद्वारे लागूनच असलेल्या शेतात,असताना मात्र प्रवेश देण्यात आला आहेत शासनाच्या निर्देशानुसार आर टी ई च्या अर्जातच लिहिले आहेत की वर नमूद केलेली सर्व माहिती माझ्या ज्ञानाप्रमाणे सत्य असून त्यात कोणत्याही प्रकारची खोटी माहिती आढळून आल्यास माझ्या पाल्यास आर टी ई २५ % अंतर्गत मिळू शकणारा प्रवेश रद्द होईल याची मला पुर्ण जाणीव असून मला या गोष्टीची जाणीव आहेत की गुगल मॅप वर माझ्या राहत्या घराचे अचूक ठिकाण निवडून लोकेशन बलून माझ्या राहत्या घरावरच दाखविण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहेत असे अर्जावरच नमूद असून याची पडताळणी करण्याची जबाबदारी ही तालुका शिक्षण अधिकाऱ्यांची असताना प्रवेश दिलेल्या अनेक पाल्यांचे स्थळ वेगळे दाखवीत असल्यामुळे गटशिक्षण अधिकारी सचिन कुमार मालवी यांच्या मार्गदर्शनात अधिकाऱ्यांना राहत्या निवासी घरी पाठवून चौकशी व पालकाकडून १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रवेश देण्यापूर्वी हमी पत्र लिहून घेतल्याची माहिती असून हे सर्व कागदी घोडे नाचवीण्या करिता असून कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार असल्याचे मत सुज्ञ नागरिक तसेच पालकाडून होत आहेत.
दुर्लक्षित, आर्थिक, दुर्बल वंचिताना न्याय मिळत नसतील तर शासनाचे नियम व अटी शर्ती या फक्त औपचारिकता आहेत का असा सवाल उपस्थित होत असून शिक्षण विभागाणे वेळीच मुसक्या न आवरल्यास भविष्यात खोटे गुगल लोकेशन, सह अनेक खोटी माहिती अर्जात नमूद करण्याचे प्रकार वाढणार हे मात्र विशेष…