शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित!
रिसोड (Childrens Day) : आज दिनांक 14नोव्हेंबर रोजी भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड (Bharat Secondary and Higher Secondary School, Risod) येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती, बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य श्री भांडेकर सर तर प्रमुख उपस्थितमध्ये शाळेचे पर्यवेक्षक श्री थोरात सर, जेष्ठ शिक्षिका सौ. बबेरवाल मॅडम मंचावर उपस्थित होत्या.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरूजीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली. प्रमुख उपस्थिती मध्ये पर्यवेक्षक श्री थोरात सर यांनी आपले विचार व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री भांडेकर सर यांनी भारतरत्न पंडित नेहरू (Pandit Nehru) यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांना मुले आणि गुलाबांची फुले किती आवडायची याची आठवण करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन श्री देशमुख सर यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी (Students) मोठ्या संख्येने उपस्थित होते.




