Parbhani :- परभणीतील पाथरी नगर परिषद अनागोंदी, भ्रष्ट व मनमानी कारभार करत असल्याचे म्हणत या कारभाराच्या विरोधात माजी आमदार (Former MLA) बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात पाथरी शहरातील नागरिकांनी मंगळवारी धडक मोर्चा काढत लोकशाही मार्गाने प्रशासनास जाब विचारला.
माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा !
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात मंगळवार २९ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता हा मोर्चा त्यांच्यानिवासस्थानापासून निघून चौक बाजार, सेंट्रल नाका मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथरी येथे पोहोचला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते, तर हलगी वाजवत घोषणा देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. मोर्चादरम्यान नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई, शहरातील अस्वच्छता(unsanitary), कचऱ्याचे साम्राज्य, घरकुल योजनेतील हप्ते न मिळणे, रस्त्यांवरील खड्डे, नगर परिषदेमार्फत होणाऱ्या सेवांचा दिरंगाई, अवैध कंत्राटी नियुक्त्या, भ्रष्टाचार, अकार्यक्षम प्रशासन, तसेच गरजू लाभार्थ्यांचे थांबवलेले अनुदान आदी विविध गंभीर मुद्दे उपस्थित केले.
प्रशासकाच्या अनागोंदी कारभाराविरोधात मोर्चेकरांचा संताप
मोर्चानंतर उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राजेश घोडे, सुभाष आबा कोल्हे, संतोष देशमुख, दत्ताराव मायंदळे, मुजाहेद खान, डॉ. राजेंद्र चौधरी, जुनैद खान दुर्राणी, नारायणराव आढाव, मुखीद सेठ जाहगीरदार, शेख खुर्शीद, कलीम अन्सारी, एम.एम. मोईज अन्सारी, विशुद्धानंद वैराळ, प्रकाश कटारे, संदिप दातारे, हन्नान खान दुर्राणी, मल्हार कसबे, दादाराव गवारे, पिंटुसेठ बाहेती, सुनिल उन्हाळे, राजीव पामे, शेख मुस्तफा टेलर, अॅड. मलीक पटेल, नईम खान, सिकंटर टेलर, रिंकु पाटील, महिपाल सरपंच तसेच पाथरी शहरातील असंख्य नागरिक, महिलावर्ग आणि विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
