औसा (Hingoli) :- औसा नगर पालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या औसा शहर पथ विक्रेता समिती निवडणूक (Elections) २०२५ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते खुंदमिर मुल्ला यांच्या मार्गदर्शना खालील औसा शहर पथ विक्रेता विकास पॅनल बिनविरोध विजयी झाले.
खुंदमिर मुल्ला यांचे औसा शहर पथ विक्रेता विकास पॅनल विजयी
औसा नगरपरिषद पथविक्रेता सदस्य पदाची निवडणूक आठ जागांसाठी घेण्यात आली. यासाठी 22 मार्च रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले होते. आरक्षणानंतर प्रवर्गनिहाय नामनिर्देशन पत्र 25 मार्च रोजी स्वीकारण्यात आले होते. त्यानंतर अर्जाची छाननी करून वैध अर्ज व पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. 28 मार्च रोजी या निवडणुका बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून श्री नियामत मुस्तफा लोहारे, श्री गौसोद्दिन बशीरसाब जर्दी, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून मंजू प्रकाश कांबळे, अनुसूचित जाती गटातून संतोष अंकुश कांबळे, अनुसूचित जमाती गटातून भानुदास बाबुराव कोळी, इतर मागास प्रवर्गातून जुबेर मुसिक बागवान, अल्पसंख्यांक महिला गटातून जैबुन्निसा रफिक अहमद हन्नुरे, दिव्यांग महिला प्रवर्गातून लक्ष्मी दिलीप सावळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीनंतर विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक भराट, नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पथविक्रेता सदस्य यांच्या कामाविषयीची माहिती व निवडणूक विषयक कामांमध्ये अकबर शेख, शिवलिंग कांबळे यांनी सहकार्य केले. मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्या हस्ते निवडणूक निर्णय अधिकारी दीपक भराट यांचा सत्कार करण्यात आला