काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध!
मानोरा (CJI Gavai) : दिल्ली सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायदान कक्षेत झालेल्या भ्याड हल्ल्याचा मानोऱ्यात तालुका काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) वतीने निषेध नोंदविण्यात आला.
या प्रकरणात मानोरा तालुका काँग्रेसच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद केले की, भारताचे सरन्यायाधीश भूषण आर गवई हे भारताचे भूषण ठरले आहेत. त्यांच्यावर ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील विधीज्ञ राकेश किशोर यांनी भ्याड हल्ला केला. त्या घटनेचा मानोरा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध (Prohibition) नोंदविण्यात आला. अशा प्रवृत्तींना कायमस्वरूपी आळा बसावा म्हणून त्यांच्या विरोधात कठोर कायदा व शासन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतेवेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज, काँग्रेसचे अध्यक्ष अमोल तरोडकर, शहराध्यक्ष हाफीज खान, काँग्रेसचे पदाधिकारी डॉ निरंजन खुपसे, डॉ अशोक पाटील, रामनाथ राठोड, वसंता भगत, इफ्तेखार पटेल आदी उपस्थित होते.