विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
पुणे (CM Devendra Fadnavis) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन,पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली.
✨ Mauli Mauli! In the Chant of Vitthala, the Soul Found Its Home… ✨
Where the soil of Dehu breathes devotion and the very air hums ‘Mauli Mauli’, the soul melted before Vitthal-Rukmini and Sant Tukaram Maharaj’s sacred Shila. The beats of taal-mrudung, the unending chants of… https://t.co/rfDEZ0NOiu
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2025
टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी (Tukaram Maharaj) श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ 🚩
टाळ-मृदुंगाच्या तालावर 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा गजर करत भक्तिरसात तल्लीन वारकऱ्यांसमवेत श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून जगदगुरु श्री संत तुकाराम… pic.twitter.com/FSA37xoJY5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2025
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीमती सुनेत्राताई पवार, आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प.
विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.
पांडुरंग हरी, पांडुरंग हरी…🙏🏻
विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान🛕🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. तसेच याच परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम… pic.twitter.com/V84KA68Ib8
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 18, 2025
दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उपस्थिती वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली. महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.