कोरची (Samrudh Panchayat Raj) : गावाच्या विकासावरच राष्ट्राचा विकास अवलंबून आहे त्या अनुषंगाने शासना मार्फत राबविण्यात येणा-या मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात सहभागी होवून गावांचा शाश्वत विकास साधावा, असे आवाहन पंचायत समिती कोरची चे गट विकास अधिकारी राजेश फाये (BDO Rajesh Faye) यांनी केले.
पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित (Samrudh Panchayat Raj) मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान तालुका स्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरची तालुक्याचे तहसिलदार प्रशांत गड्डम, उद्घाटक म्हणुन जि.प. गडचिरोलीचे कृषी विकास अधिकारी खोमणे, तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी जि. प. सदस्य अनिल केरामी, पंचायत समितीचे माजी उपसभापती सदाराम नुरुटी, तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी, तालुका कृषी अधिकारी मिसार, गट शिक्षणाधिकारी दास, कोचीनारा ग्रामपंचायतचे सरपंच सुनिता मडावी आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पुढे बोलतांना बिडीओ फाये (BDO Rajesh Faye) म्हणाले, या अभियानाचा उद्देश केवळ पुरस्कार प्राप्त व्हावा हे नसुन या अभियानच्या माध्यमातुन गावाच्या विकासाची एक प्रक्रिया राबविणे हा आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना केले
या (Samrudh Panchayat Raj) अभियानात सहभागी होण्याकरीता ग्रामपंचायतींनी पीएम आवास, लघु पाटबंधारे, श्रमदानातुन पांदन रस्ते, वनराई बंधारे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करणे, लोकवर्गणीतुन शाळेचे सौदर्याकरण करणे, अंगवाणवाडी बोलक्या भिंती इ. बाबतचे विविध कामे करावे आणि सर्व ग्रामस्थांना या अभियानाबद्दल माहिती द्यावी असे सांगीतले.
यावेळी तहसिलदार प्रशांत गड्डम यांनी महसुल विभागा मार्फत राबविल्याजाणा-या विविध योजना बंद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच, अंगणवाडी सेविका, बचत गटांच्या महिला व सर्व विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. या (Samrudh Panchayat Raj) कार्यक्रमाचे संचालन विनोद गडपायले यांनी केले तर, प्रास्ताविक विस्तार अधिकारी मदन काळबांधे यांनी केले तर आभार तिरेंद्र मंडारे यांनी माणले.