आंदोलन संदर्भात पोहरादेवी नियोजन सभा!
मानोरा (Compensation) : तालुक्यातील उमरी बु मंडळातील पोहरादेवीसह इतर गावातील ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने बाधीत झालेल्या नागरिकांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी, यासंदर्भात तहसीलदार (Tehsildar) यांना वारंवार निवेदन देत मागणी करूनही न्याय न मिळाल्याने पोहरादेवी येथील ग्राम पंचायत कार्यालयात दि. १९ ऑक्टोबर याबाबत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आंदोलन (Aandolan) छेडण्यासंदर्भात नियोजन बैठक घेण्यात आली. उद्या लक्ष्मी पुजन दिनी तहसिल कचेरीवर आमरण उपोषण करण्याचा एकमताने पूर बाधितांनी ठरविले.
उद्यापासून तहसिल कचेरीवर पूर पीडितांचे आमरण उपोषण!
अतिवृष्टी (Heavy Rain) ढगफुटीमुळे आलेल्या महापुराचे पाणी अनेक नागरिकांच्या (Citizens) घरात घुसल्याने घरांची पडझड व संसार उपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले होते. यासंदर्भात प्रशासनाच्यावतीने नुकसानीचे पंचनामे सुध्दा करण्यात आले. परंतु अद्याप पर्यंत पूर बाधिताना झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे अद्यावत जमा झाले नाही . यासंदर्भात पोहरादेवी येथील ग्राम पंचायत (Gram Panchayat) कार्यालयात रविवारी मिटिंग आयोजित करण्यात आली. दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तहसील कार्यालय मानोरा येथे उपोषण आंदोलन करण्याचे एकमताने सर्वानुमते ठरवण्यात आले. नियोजीत सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच हेमंत राठोड, प्रमुख मार्गदर्शक माजी पंचायत समिती विजय पाटील, महंत रमेश महाराज, वि.वि. कार्य. सोसायटी अध्यक्ष रमेश ढोके, पूर बाधीत व गावातील नागरिक, महिला मंडळ व युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.