मुंगसाजीनगर मानोरा येथील असल्याची खात्री
नातेवाईक पोहोचले ग्रामीण रुग्णालयात
नातेवाईक पोहोचले ग्रामीण रुग्णालयात
मानोरा (Manora Rural Hospital) : शहरातील मुंगसाजीनगर मानोरा येथील विवाहीत विठ्ठल भिमराव गिऱ्हे ( वय ३५ ) हा युवक गणपती मंदिराजवळ अरुणावती नदी पात्राच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत असताना दि. २१ सप्टेंबर रोजी काही लोकांना आढळून आला. त्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत सदरील व्यक्तीस (Manora Rural Hospital) ग्रामीण रुग्णालय मानोरा येथे प्रथम उपचार करिता आणले असता नातेवाईक दवाखान्यात हजर झाले आहे. सदरील युवकाची प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरीता वाशिम येथे डॉक्टरानी रेफर केले आहे.
मुंगसाजी नगर मानोरा येथील विठ्ठल गीऱ्हे हा युवक पांढरकवडा येथे आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरीवर आहे. त्याचे यवतमाळ येथील आरोग्य विभागात वरिष्ठ लिपीक म्हणून नुकतेच प्रमोशन झाले आहे. तो आपल्या गावी मानोरा येथे आला होता. त्याची पत्नी माहेरी असताना रविवारी सकाळी आईला काकाच्या घरून जाऊन येतो म्हणून सांगून गेला होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अरुणावती नदी पात्रात गणपती मंदिराजवळ पाण्याच्या प्रवाहात वाहत असताना काही नागरिकांना विठ्ठल गीऱ्हे हा आढळून आला.
प्रकृती चिंतेबाहेर, पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी केले रेफर
नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे भ्रमणध्वनी करून सदर घटनेची माहिती दिली असता पोलिस घटनास्थळी दाखल होवून त्या युवकाला (Manora Rural Hospital) शासकीय सामान्य ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची ओळख पटत नसल्याने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यानंतर शहरातील धामणी मानोरा येथील असल्याचे समजले. काही वेळातच ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक हजर झाले. याबाबतची अधिक माहिती घेतली असता त्या युवकाची प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती माहिती प्राप्त झाली असुन पुढील उपचाराकरीता वाशिम येथे डॉक्टरानी रेफर केले आहे.