ग्रा. प. च्या मालकीच्या जागेवर सभागृहाचे बांधकाम नियमानुसार!
मानोरा (Construction of Auditorium) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे धानोरा बु परिसरातील संत सेवालाल महाराज व जगदंबा माता समोरील सभागृहाचे बांधकाम ग्राम पंचायच्या (Gram Panchayat) मालकीच्या जागेवर कायदेशीर करण्यात येत आहे. या संदर्भात केलेली तक्रार तथ्यहीन आहे. त्यामुळे सुरू असलेले सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे, असे शेकडो सहीचे निवेदन ग्रामस्थानी (Villagers) गट विकास अधिकारी यांना दि. १३ ऑक्टोबर रोजी दिले आहे.
शेकडो सहीचे बिडिओ यांना निवेदन!
निवेदनात नमूद केले आहे की, मौजे धानोरा बु येथे संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिर समोरील ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवर बंजारा तांडा योजनेअंतर्गत सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. सदर सभागृह बंजारा समाजाचे धार्मिक, लग्न सोहळा कार्यक्रमासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण काही खोडसर लोकांनी गुरासाठी राखीव जागा असल्याची खोटी तक्रार दिली आहे. गुरे ढोरे करीता मंदिर व सभागृह परिसरात भरपूर प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे खोट्या तक्रारीला केराची टोपली दाखवून सभागृह बांधकाम पूर्ण करून या भागात वास्तव्य करणाऱ्या बंजारा समाजाला न्याय द्यावा, असे शेकडो सहयाचे निवेदन ग्रामस्थानी बिडिओ यांना दिले आहे. निवेदनावर ग्राम पंचायत सदस्य प्रकाश कुऱ्हाडे, डोमा गवई, सदस्या पुष्पा राठोड, बेबी संजय राठोड, खुशाल राठोड, सुनीता बाळू राठोड, रेणुका वडते, सुरेश पवार, गीता दिलीप राठोड, ज्योती निलेश राठोड, सुभाष चव्हाण, भारती राठोड, राजेश जाधव, कांता जाधव, करण पवार आदीसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.