अमृत भारत योजनेतंर्गत हिंगोलीच्या रेल्वे स्टेशनवर विकासाची कामे जोमात
हिंगोली (Hingoli Railway Station) : अकोला-पूर्णा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे उद्घाटन ११ नोव्हेंबर २००८ रोजी हिंगोली रेल्वे स्थानकावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते. त्यावेळी जून्या शहरातून आदर्श महाविद्यालयाकडे जाण्याकरीता ८ फुट रूंदीचा दादरा पायदळ व दूचाकी वाहन येण्या जाण्यासाठी सुरू करण्यात आला होता. त्याचवेळी (Hingoli Railway Station) प्लॅटफार्म क्र.१ वरून २ वर येण्या जाण्यासाठी नवीन पायदळ पुल सुध्दा सुरू करण्यात आला. त्यानंतर मार्च २०२४ पासुन पूर्व दिशेला प्लॅटफार्म क्र.१ व २ ला जोडणारा दुसरा नवीन पायदळ पुल प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आला.
अमृत भारत स्टेशन योजनेत (Amrit Bharat Yojana) यावर्षी (Hingoli Railway Station) प्लॅटफार्म क्र.१ व २ ला जोडणारा जूना पायदळ पुल पाडण्यात आला. त्याच्या जागी ४० फुट रुंदीचा नवीन पायदळ पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नवीन पायदळ पुल प्लॅटफार्म क्र.२ व १ ला जोडून पुढे याच दादर्याचा विस्तार मुख्य इमारतीच्या बाहेर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.
हिंगोली रेल्वे स्थानकात (Hingoli Railway Station) प्लॅटफार्म क्र.१ वरून २ वर येण्या जाण्यासाठी पुर्व दिशेला अतिरिक्त दादरा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची या दादर्याचा वापर करावा व रेल्वे रुळ ओलांडू नये, जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही प्रवासी संघटने अध्यक्ष धरमचंद बडेरा, जेठानंद नेनवाणी, गणेश साहू, प्रविण पडघन, डॉ. निलावार आदींनी केले आहे.