Yawatmal electric shock news :- गणेश नगर राळेगाव परिसरात एका घराचे बांधकाम सुरू असताना बांधकाम मजूर कैलास महादेव अरबट वय २१ वर्ष या मजुराचा विजेचा शॉक (Electric shock) लागून जागीच मृत्यू झाला तर दुसरा मजूर विजू मारोतराव वरठी वय ४५ वर्ष हा गंभीर जखमी असून राळेगाव ग्रामीण रुग्णालयात (Ambulance) उपचार घेत आहे
घराचे बांधकाम सुरू असताना घडली घटना
गणेश नगर परिसरात अतुल उघडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना गंभीर अपघात घडला. संबंधित ठिकाणी असलेल्या टॉवरच्या अगदी जवळून उच्चदाब (हाय व्होल्टेज) वीज वाहिनी गेली असून, बांधकामाच्या वेळी वापरण्यात येणारे लोखंडी पाइप वर चढवित असताना ते थेट वीज तारेला स्पर्श केले. या धक्कादायक अपघातात कैलास अरबट (मजूर) याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मजूर विजू वरठी याच्या हाताला गंभीर भाजल्या झाल्या असून त्याच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अशा धोकादायक ठिकाणी कोणतीही खबरदारी न घेता सुरू असलेल्या बांधकामांबाबत प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.




