लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता!
मानोरा (Construction Work) : तालुक्यातील मंजुरात भुली-हातोली रस्ता, पुलाचे बांधकाम व नाला सरळीकरचे काम काम एका शेतकऱ्याने अडविल्याने रखडले होते. काम सुरु करण्याबाबत वारंवार संबंधित विभागाला कळवून देखील सुरू करण्यात न आल्यामुळे न्यायासाठी तहसील कचेरीवर (Tehsil Court) दि. 13 जूनपासून माजी प स सदस्य अशोक चव्हाण यांच्यासह शेतकरी उपोषणाला (Hunger Strike) प्रारंभ केला होता. मात्र उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार (Tehsildar) व ठाणेदार यांनी लेखी आश्वासन देत ‘ऑन द स्पॉट’ भेट देऊन पाहणी करत कामाला सुरुवात केल्याने आंदोलन कर्त यांना लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
वर्क ऑर्डर होऊन 2 वर्ष उलटली, तरी पण अद्याप कामाला सुरुवात…
दिलेल्या निवेदनानुसार भुली ते हातोली रस्त्यावरील रस्ता, पुल बांधकाम व नाला सरळीकरण या कामासाठी दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांनी 1 कोटी 50 लाख रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर करून आणले होते. या कामाची वर्क ऑर्डर होऊन 2 वर्ष उलटली, तरी पण अद्याप कामाला सुरुवात करण्यात आलेली नव्हती. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला (Construction Department) कामे मार्गी लावणे संदर्भात वारंवार कळवून देखील याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे न्यायासाठी उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारला तहसीलदार डॉ संतोष यावलीकर व पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे (Police Inspector Pravin Shinde) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून यशस्वी मार्ग काढत न्याय दिल्याबद्दल उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.