अॅड. सुरेश गडदे यांचा युक्तिवाद ; तक्रारदारास मिळवून दिली रक्कम
हिंगोली (Hingoli insurance company) : कोरोना रक्षक विमा अंतर्गत काढलेल्या पोलिसी बाबत तक्रारदाराने (insurance company) विम्याची रक्कम मिळावी यासाठी इफको टोकियो कंपनीकडे घाट घातला मात्र रक्कम देण्यास तयार नसल्याने अखेर अॅड. सुरेश गडदे यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली. अॅड.सुरेश गडदे यांनी युक्तिवाद केला असता आयोगाने रक्कम देण्याचे आदेश दिले.
दरम्यान याबाबत रेखा निलेश पित्ती वय ५०, निलेश गुरूप्रसाद पित्ती, हिंगोली आणि शुभांगी वाघमारे श्रीनगर हिंगोली या तिघांनी कोरोना रक्षक (insurance company) विमा अंतर्गत इफ्को टोकियो कंपनी यांच्या सोबत करार केला होता. त्या करारा नुसार कोरोना झाला असेल तर विमा कंपनीने दोन लाख ५० हजार प्रत्येकी तक्रारदाराना देणे बंधनकारक होते. मात्र सदरील कराराचा विमा कंपनीने भंग केल्याने तक्रारदार यांनी अखेर अॅड. सुरेश गडदे पार्वती टॉवर येथे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात प्रकरण दाखल करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे अॅड. सुरेश गडदे यांच्या मार्फत तक्रार दाखल केली. सदरील दाव्यामध्ये विद्यमान आयोगाने ५ ऑगस्ट रोजी तक्रारदार यांच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकूण घेत सर्व तक्रारी मंजूर करून विमा कंपनीला विमा करारानुसार वरील रक्कम व्याजासहित १५ दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिले. त्या नुसार (insurance company) विमा कंपनीने तक्रारदाराना त्यांच्या नावाने प्रत्येकी तीन लाख ३८ हजाराचे धनादेश दिले.या प्रकरणात अॅड. सुरेश गडदे यांना अॅड. मनीषा गडदे, अॅड. विपीन अर्धापूरकर, अॅड. के. एन. मस्के, अॅड. सचिन पोले, अॅड. लेकुळे यांनी सहकार्य केले