राहुल गांधी यांच्याबद्दल भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांनी केले वादग्रस्त वक्तव्य!
नांदेड (Controversial Statement) : केरळमधील भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव (Pintu Mahadev) यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नांदेडमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी पिंटू महादेव यांना तातडीने अटक करावी आणि त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करून अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण (MP Ravindra Chavan) यांनी केली आहे.
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित!
नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना खासदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, पिंटू महादेव यांचे वक्तव्य अत्यंत गंभीर आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. अशा प्रकारचे द्वेषपूर्ण वक्तव्य समाजात अशांतता निर्माण करू शकते. त्यामुळे पिंटू महादेव यांना तात्काळ अटक करावी अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा काँग्रेस पक्षाचे खा. रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून, भाजप प्रवक्त्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित!
यावेळी काँग्रेस पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे,महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफूर,प्रदेश महासचिव अँड सुरेंद्र घोडजकर,प्रदेश महासचिव डाॅ.रेखाताई चव्हाण,डाॅ.श्रावण रॅपनवाड,डाॅ.करूणा जमदाडे,युवक काँग्रेसचे अतुल पेदवाड,मसुद खान,महेश देशमुख,सत्यपाल सावंत,रत्नकर जोंधळे,सिमोन नागोरे,गोविंद पाटील यांच्यासह असंख्य काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.