सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने वाचले प्राण
उपचारार्थ दोघेही रुग्णालयात दाखल
तिवसा (Couple Suicide Attempt) : 30 वर्षीय युवक व एक अल्पवयीन मुलगी या प्रेमीयुगुलाने आज 18 मे रोजी राष्ट्रीय महामार्गावरील एका जीर्ण इमारतीमध्ये विषारी औषध प्राशन करून (Couple Suicide Attempt) आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र ही बाब सामाजिक कार्यकर्ते भूषण यावले यांना समजताच त्यांनी तातडीने दोघांना उपचारार्थ तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
तिवसा तालुक्यातील एक प्रेमी युगुल गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. आज (रविवार) सकाळी सुमारास नऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णाई पेट्रोलियमसमोरील एका जीर्ण इमारतीमध्ये त्या युगुलाने विषारी औषध प्राशन केले असता ते मरणासन्न अवस्थेत असल्याचे परिसरातील काही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती कृष्णाई पेट्रोलियमचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते भूषण यावले यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. (Couple Suicide Attempt) याठिकाणी प्रेमी युगुल अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. त्यांनी त्वरित १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला.
मात्र वेळेत सेवा न मिळाल्याने त्यांनी पोलिसांच्या मदतीने पोलीस व्हॅनद्वारे दोघांनाही तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या (Couple Suicide Attempt) युगुलामध्ये युवक हा तळेगाव ठाकूर येथील असून युवती अल्पवयीन असल्याचे समजते. दोघेही गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते आणि त्याबाबतची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी तिवसा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. घटनास्थळी त्यांच्याकडे तेल, साबण, टूथपेस्ट, ब्रश यांसारख्या वैयक्तिक वस्तू आणि नवीन दुचाकी आढळून आली.
या (Couple Suicide Attempt) संपूर्ण घटनाक्रमामध्ये भूषण यावले यांच्यासोबत गणेश कोयरे आणि किरण ठाकूर यांनीही मदत करत अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या वेळेवरच्या कृतीमुळे या दोघांचे प्राण वाचले. सध्या त्यांच्यावर तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून युवकाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अमरावती येथे हलविण्यात आले आहे.पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.