पत्नी व सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!
परभणी (Crime Case) : परभणीच्या गंगाखेड येथे पतीने जोरात बोलल्याचे मुलीने वडिलांना सांगताच काठीने मारून जावयाचं डोकं फोडल्याची घटना तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे घडली. याप्रकरणी शुक्रवार 18 जुलै रोजी रात्री गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) फिर्यादीची पत्नी व सासऱ्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
सासऱ्यासह अन्य दोघांविरुध्द गुन्हा दाखल!
तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील सुभाष शामराव कुंडगीर वय 39 वर्ष यांनी दि. 15 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास पत्नी अनुसया हिला जेवणासाठी दे असे म्हटले तेंव्हा स्वंयपाक केला नाही असे म्हटल्याने त्यांनी पत्नीला मोठयाने बोलले ही बाब पत्नीने गावातच राहत असलेल्या वडीलांना कळविली असता रात्री 9:15 सुमारास त्यांचा सासरा नवनाथ देवराव केजगीर त्यांचे सोबत मनोहर देवराव केजगीर व शिवाजी सोपान कुंडगीर सर्व रा. डोगरपिंपळा हे हतात काठी व कुऱ्हाड घेऊन घरासमोर आले व मोठ मोठयाने शिवीगाळ करुन तु घराबाहेर निघ तुझं हात पाय तोडतो अशी धमकी देऊ लागले तेव्हा माझा नवरा जेवणासाठी मला भांडला व तो नेहमी त्रास देतो असे म्हणुन पत्नी अनुसया सुभाष कुंडगीर हीने सुद्धा शिवीगाळ केल्यावरुन सुभाष कुंडगीर घराबाहेर आले असता, सासरा व त्याचे सोबत आलेल्या दोघांनी पुन्हा शिवीगाळ केली. सासरा नवनाथ देवराव केजगीर यांनी तोंडावर चापटा मारुन पकडले व मनोहर देवराव केजगीर याने त्याच्या हातातील काठीने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. गावातील लोकांनी भांडण सोडवील्यानंतर फिर्यादीची पत्नी अनुसया कुंडगीर, सासरा नवनाथ केजगीर व दोघांनी तु आमचे नादी लागलास तर खतम करुन टाकू अशी धमकी दिल्याची फिर्याद सुभाष शामराव कुंडगीर यांनी दिल्यावरून ठाणे अंमलदार शेख फेरोज, पो. शि. मोहन महामुने यांनी फिर्यादीची पत्नी, सासऱ्यासह अन्य दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोउपनि सोनेराव बोडखे करीत आहे.