गोंदिया अवैध शस्त्र

पिस्टल व दोन जीवंत काडतुसासह आरोपीला अटक; स्थागुशाची कारवाई 

Gondia illegal weapon: गोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी एका आरोपीला विना परवाना पिस्टल व दोन जीवंत काडतुसासह अटक केली. आरोपीचे नाव शुभम हरदिये

पिस्टल व दोन जीवंत काडतुसासह आरोपीला अटक; स्थागुशाची कारवाई 

Gondia illegal weapon

गोंदिया (Gondia illegal weapon) : जिल्ह्यात अवैध धंदे तसेच अवैध शस्त्र बाळणार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश आहेत.  दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्ती  असतांना स्थानिक नेहरू चौक परिसरात एक इसम संशयास्पदरित्या वावर असल्याची माहिती स्थागुशाच्या पथकाला मिळाली. दरम्यान त्या युवकाचा ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता, त्याच्याजवळून   विना परवाना पिस्टल व दोन जीवंत काडतुस पोलिसांनी हस्तगत करून आरोपीला अटक केली. शुभम पुरुषोत्तम हरदिये (२८) रा. बाजपेई चौक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

सविस्तर असे की, २२ एप्रिल रोजी स्थागुशाचे पथक गस्ती असतांना  तसेच  संबंधित युवकाची माहिती मिळाल्याच्या आधारावर शोध घेत असतांना नेहरु चौक चे जवळ जनता पावभाजी समोरिल  मार्गावर  संशयित इसमाने पोलीसांना पाहुन त्याचे कमरेतुन एक पिस्तुल काढुन बाजुला असलेल्या कपड्याच्या दुकानात लपविली.  

त्यानंतर पोलिसांनी इसमास ताब्यात घेवुन त्याला ताब्यात घेतले. (Gondia illegal weapon) दरम्यान शुभम पुरुषोत्तम हरदिये असे सांगितले व त्यास पोलीसांना पाहुन कपडयाच्या दुकानात काय लपविले आहे याबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. कपडा दुकानदार  विचारणा केली असता त्याने वस्तु लपवून ठेवल्याची कबुली दिली. दरम्यान झडती घेण्यात  आल्यावर कपडा दुकानाचे ठेल्यावर खरड्याच्याखाली एक देशी बनावटीचे लॉखडी पिस्टल ज्यामध्ये २ राउंड लोड असलेली किंमत राउंडसह ५१ हजार  मिळुन आली. ती पंचासमक्ष कायदेशिररित्या आरोपीकडुन जप्त करण्यात आली आहे.  आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे. गोंदिया शहर पोलीस हे करीत आहेत.

आरोपीवर अनेक गुन्हे दाखल 

घटनेतील आरोपी (Gondia illegal weapon) शुभम हरदिये  याचेवर  जिल्हयात खुन, दरोडा, जबरीचोरी,  आर्म एक्ट, जुगार असे एकुण ११ गंभीर गुन्हे दाखल  आहेत. शिवाय तो  सन २०२१ मध्ये गोंदिया जिल्हयातुन ३ महीन्याकरीता तडीपार करण्यात आला होता तसेच सन २०२४ मध्ये एम.पी.डी.ए. अंतर्गत १ वर्षाकरीता अमरावती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले होते.  सदरची कारवाई  स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.  पुरूषोत्तम अव्हेरकर यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक राजु मिश्रा, पो.हवा. महेश मेहर, पो. हवा. सोमेन्द्रसिंह तुरकर, पो.हवा. संजय चौहान, पो.शि. संतोष केदार, पो.शि. राकेश इंदुरकर, पो.शि. विठ्ठले, चा.पो.शि. राम खंडारे यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

हिरानंदानीतील विकासकाच्या तक्रारीनंतर मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांनी अटक केली. फसवणूक आणि खंडणी प्रकरणात चौकशी सुरू.

Oct 02, 2026