लैंगिक शोषण प्रकरण

युवतींचे लैंगिक शाेषण व व्हीडीओ व्हायरल प्रकरणी आणखी चार आराेपी अटकेत

Sexual abuse cases: अमरावतीमध्ये युवतींचे लैंगिक शोषण व त्यांचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. तपास सुरू आहे.

युवतींचे लैंगिक शाेषण व व्हीडीओ व्हायरल प्रकरणी आणखी चार आराेपी अटकेत

Sexual abuse cases

अमरावती (Sexual abuse cases) : परतवाडा येथील युवतींचे लैंगिक शाेषण व व्हीडीओ  व्हायरल केल्या प्रकरणाची पाेलीस पाळेमुळे खणत असून हा लैंगिक शाेषणाचा प्रकार हा परतवाडा शहरात नव्हे तर अमरावतीच्या कठाेरा नाका परिसरातील एका सदनिकेत झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे. पाेलीसांनी या सदनिकेची आज झाडाझडती घेतली असून या प्रकरणात सदनिकेत भाड्याने राहत असलेल्या युवकासह अन्य तिघांना अटक केली आहे.

परतवाडा येथील युवतींचे लैंगिक शाेषण व त्यांचे आक्षेपार्ह व्हीडीओ व फोटाे व्हायरल प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. जिल्ह्याचे पाेलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी बुधवारी 10 अधिकारी व 36 अंमलदार यांच्या एसआयटी विशेष स्वतंत्र तपास पथकाची स्थापना केली हाेती. या (Sexual abuse cases) प्रकरणातील मुख्य आराेपी  अयान अहमद तनविर अहमद (19,, रा. परतवाडा) याचे विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 294, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम 8 व 12 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 व 67 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून  ताे 21 तारखेपर्यत पाेलीस काेठडीत आहे. त्याचा माेबाईल जप्त करण्यात आला आहे. साेशल मिडीयावर उपलब्ध व्हिडीओ क्लीपमध्ये 8 पिडीत मुलींचे 18 व्हिडीओ व 39 फोटाे आढळून आले आहेत.  आराेपी अयान याच्या व्यतिरिक्त व्हिडीओ क्लीप प्रसारित करणारे  उजेर खान इकबाल खान (20), माे. साद माे. साबीर (22), तरबेज खान तसलीम खान (24, तिन्ही रा. अचलपुर) यांना देखील बुधवारी अटक करण्यात आली हाेती. सर्व आराेपितांकडून त्यांचे माेबाईल जप्त करण्यात आले आहेत.

तपासादरम्यान (Sexual abuse cases) आराेपी अयान याने पिडीत मुलीचे लैंगिक शाेषन त्याच्या अमरावती येथील एका मित्राच्या कठाेरा नाका परिसरात एका अपार्टमेंटच्या सदनिकेत केल्याची कबूली पाेलीसांना दिली. यानंतर आज पाेलीसांनी सकाळी या सदनिकेची झाडाझडती घेतली. सदर सदनिकेत राहणारा आराेपी मित्र मानव दिपक सुगंधे (20,रा.आर्वी, ह.मु.अमरावती) यास देखील पाेलीसांनी अटक केली. तसेच व्हिडीओ क्लीप आराेपीतांकडून प्राप्त करून साेशल मिडीया वर प्रसारित करणारे ऍाज खान मंजुर खान (26), माे. इमरान माे. साजीद (21) व शे. नावेद शे. हसन (21,तिघेही रा. अचलपूर) यांना सुध्दा अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून त्यांचे माेबाईल तसेच घरझडती दरम्यान आराेपी अयाज याचे ताब्यातून लॅपटाॅप, टॅब, हार्डडीस्क जप्त करण्यात आले आहेत. त्याची फॉरेन्सिक तज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. सर्व आराेपींची घरझडती घेण्यात आली आहे. तसेच ज्या मुख्य आराेपी अयान याने आराेपी मानव सुगंधे याच्या ज्या फफ्लॅटवर पीडीतांचे याैन शाेषण केले आहे त्याठिकाणी पंचनामा व घरझडती घेण्यात आली आहे. सदर गुन्हयातील पीडीत मुलींची व त्यांचे पालकांची ओळख पटवून त्यांना तक्रार देण्याकरीता पुढे येण्यास पाेलिसांकडून सामाजिक संस्थांद्वारे समुपदेशन करण्यात येणार आहे.

आराेपींची संख्या आठ
सदर गुन्हयाचे तपासात (Sexual abuse cases) आराेपींची संख्या आठ वर पाेहाेचली आहे. सर्व आराेपींना अटक आहे. यातील आज अटक करण्यात आलेल्या चार आराेपींना न्यायालयाने येत्या 23 तारखेपर्यत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासात आणखी व्हिडीओ क्लीप प्रसारित करणारे इसमांचा शाेध घेण्यात येत आहे. गुन्हयाची व्याप्ती व गांभीर्य पाहता गुन्हयाचा सखाेल तपास व्हावा यासाठी आयपीएस व सहाय्यक पाेलीस अधिक्षक शुभमकुमार यांचे नेतृत्वात विशेष तपास पथकाचे गठीत करण्यात आले असुन सदर तपास पथकात 10 पाेलीस अधिकारी व 36 पाेलीस अंमलदार यांचा समावेश करण्यात आला आहेत.

संबंधित सामग्री

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

हिरानंदानीतील विकासकाच्या तक्रारीनंतर मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांनी अटक केली. फसवणूक आणि खंडणी प्रकरणात चौकशी सुरू.

Oct 02, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

Congress candidate Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांची आढावा बैठक

Sep 29, 2026
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

Amravati Teachers Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली..

Sep 29, 2026