परभणी अवैध शस्त्र

अवैध शस्त्रासह फिरणार्‍या युवकास पोलिसांनी केली अटक

Parbhani Illegal weapon: परभणी शहरात अवैध शस्त्र बाळगणार्‍या एका युवकास नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. यावेळी युवकाकडे धारदार चाकू आढळून आला.

अवैध शस्त्रासह फिरणार्‍या युवकास पोलिसांनी केली अटक

Parbhani Illegal weapon

काद्राबाद प्लॉट परिसरात कारवाई; नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

परभणी (Parbhani Illegal weapon) : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नानलपेठ पोलिसांनी  अवैध शस्त्र बाळगणार्‍या एका युवकास ताब्यात घेत  कारवाई केली आहे. शनिवार २५ एप्रिल च्या पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

घटने बाबत अधिक माहिती अशी की, इमाम अहमद रजा चौक परिसरातील काद्राबाद प्लॉट येथे फहीम किराणा दुकानासमोर एक युवक संशयास्पद हालचाली करत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिस नाईक नारायण जिजाराव पोले यांनी तात्काळ  घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. झडती दरम्यान संबंधित युवकाकडे धारदार चाकू आढळून आला. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अवैध शस्त्र बाळगणे हा गंभीर गुन्हा मानला जात असल्याने (Parbhani Illegal weapon) पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली. या प्रकरणी शेख अल्तमशुद्दीन शेख नियाझुद्दीन रा.सुभेदार नगर, याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये नानलपेठ पोलीस ठाण्यात पोलिस नाईक नारायण जिजाराव पोले यांच्या फिर्यादीवरून शेख अल्तमशुद्दीन शेख नियाझुद्दीन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या अवैध कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026