हिंगोली जुगार प्रकरण

हिंगोली शहरातील जुगार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचार्‍याचे निलंबन

Hingoli gambling case: शहरातील एनटीसी  भागामध्ये विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या  पथकाने झन्ना मन्ना जुगारावर छापा मारला होता. यामध्ये १८ आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हिंगोली शहरातील जुगार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचार्‍याचे निलंबन

Hingoli gambling case

 

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने हिंगोलीत झन्ना-मन्ना जुगारावर मारला होता छापा 
पोलिस कर्मचार्‍याच्या निलंबनाचे पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी काढले आदेश

हिंगोली (Hingoli gambling case) : शहरातील एनटीसी  भागामध्ये विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या  पथकाने झन्ना मन्ना जुगारावर छापा मारला होता. यामध्ये १८ आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिसाचा आरोपीमध्ये समावेश असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी त्याच्या निलंबनाचे सोमवारी आदेश काढले.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील एनटीसी भागात एका व्यापारी संकुलनात असलेल्या  गाळ्यामध्ये झन्ना-मन्ना जुगार सुरु असल्याची माहिती नांदेड  परिक्षेत्राचे विशेष  पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना मिळाल्याने त्यांनी ५ सप्टेंबर  रोजी नांदेड पथकातील सपोनि पकंज इंगळे  यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांना  छापा मारण्यासाठी रवाना केले होते. या  पथकाने मिळालेल्या माहिती नुसार सदर ठिकाणी छापा  मारला असता अनेकजण पत्त्यावर पैसे लावून झन्ना-मन्ना जुगार खेळत  असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी घटनास्थळी नगदी २ लाख १६ हजार २० रुपये, १० लाख रुपयाची चारचाकी क्रेटा कार क्रमांक एम.एच. ३८ ए.के. ११३०, ४ लाख ४० हजार रुपयाच्या ८ मोटर सायकल व १ लाख ९१ हजार रुपयाचे १५ मोबाईल असा एकूण १८ लाख ४७ हजार २० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला  होता.

या (Hingoli gambling case) गुन्ह्यात प्रारंभी १८ आरोपीवर गुन्हे  दाखल केले होते. नंतर पोलिस तपासात आरोपींची संख्या २३ झाली होती. या गुन्ह्यामध्ये जिल्हा पोलिस दलाच्या  आर्थिक गुन्हे शाखेतील विठ्ठल परसराम काळे  याचाही समावेश होता. या बाबतचा अहवाल  प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी  सोमवारी विठ्ठल  काळे  याच्या  निलंबनाचे आदेश काढले. तसेच निलंबन कालावधीत  पोलिस मुख्यालयी उपस्थित  राहण्याचे आदेशात  नमुद केले. तसेच काळे  यांची खात्यांतर्गत चौकशीही लावण्यात आली  असल्याची माहिती पोलिस  अधिक्षक लोढा यांनी दिली आहे.

टैग्स: Hingoli gambling case