तंबाखू-गुटखा कारवाई

शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Tobacco-Gutkha Action: हिंगोलीतील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार, तंबाखू-गुटख्याच्या सलूकासाठी करमचाऱ्यांवर 3400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद..

शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Tobacco-Gutkha Action

 

जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाची धडक मोहीम; 17 जणांकडून 3 हजार 400 रुपयांचा दंड वसूल

हिंगोली (Tobacco-Gutkha Action) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार तसेच अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच तंबाखूयुक्त पदार्थ सोबत बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध विशेष दंडात्मक मोहीम राबविण्यात येत आहे.

या (Tobacco-Gutkha Action) मोहिमेअंतर्गत आज पंचायत समिती, हिंगोली येथे तपासणी करण्यात आली. यावेळी कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या अथवा तंबाखूयुक्त पदार्थ सोबत बाळगणाऱ्या 14 कर्मचाऱ्यांकडून 2 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेतील विविध कार्यालयांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत 3 कर्मचाऱ्यांकडून 600 रुपयांचा दंड आकारण्यात आला. अशाप्रकारे एकूण 17 व्यक्तींवर कारवाई करून 3 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. संबंधित कर्मचाऱ्यांनी कोटपा अधिनियम, 2003 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटख्याचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार जिल्हाभर ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय व निमशासकीय कार्यालयात अचानक भेट देऊन तपासणी करण्यात येणार असल्याने कर्तव्यावर असताना कोणत्याही कर्मचाऱ्याने तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करू नये किंवा ते सोबत बाळगू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही तंबाखू-गुटखा अथवा अन्य तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करू नये किंवा ते सोबत बाळगू नयेत, असे आवाहन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने केले आहे.

ही (Tobacco-Gutkha Action) कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ) आणि आनंद साळवे (मेडिकल सोशल वर्कर) यांनीही मोहिमेत सहभाग घेतला.

कोटपा अधिनियम, 2003 मधील प्रमुख तरतुदी:

•    कलम 4 : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी. 
•    कलम 5 : तंबाखूयुक्त पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी. 
•    कलम 6 (अ) : 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री करणे अथवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. 
•    कलम 6 (ब) : शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री करण्यास बंदी. 
•    कलम 7, 8 व 9 : तंबाखू उत्पादनांच्या पॅकेटवरील किमान 85 टक्के भागावर चित्रात्मक व लिखित वैधानिक इशारा स्पष्टपणे छापणे बंधनकारक आहे. 

 

संबंधित सामग्री

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची हिंगोलीत महत्त्वपूर्ण बैठक 

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची हिंगोलीत महत्त्वपूर्ण बैठक 

Rohit Pawar: छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते व आमदार रोहित पवार हिंगोली दौऱ्यावर येत आहेत.

Jun 25, 2026
हिंगोलीत तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

हिंगोलीत तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Tobacco-Gutkha Action: तंबाखू व गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार कारवाई

Jun 23, 2026