हिवरा बु येथील घटना
मानोरा (Hivara Goats Stealing) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे हिवरा बु येथील पशुपालक शेतकरी अक्षय गजानन चंदनकार यांच्या शेळीच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी 12 बोकुड सह 5 बकऱ्या असे एकूण 17 बकऱ्या अंदाजे किंमत 1 लाख 59 हजार रुपयाचे चोरून नेल्याची घटना दि. 9 सप्टेंबर रोजी मध्य रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी फिर्यादी पशुपालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व विविध वयोगटातील 17 शेळ्या चोरी करून नेल्या. यामध्ये 12 बोकुड व 5 बकऱ्या होत्या. सकाळी गोठा उघडला असता (Hivara Goats Stealing) शेळ्या गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधितांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये खळबळ माजली आहे. चोरीच्या घटनेचा अधिक तपास मानोरा पोलीस करीत आहे.