हिंगोली अवैध फटाका साठा

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli

हिंगोली (Illegal firecracker stockpile in Hingoli) : मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून पोलिसांनी तब्बल 2 लाख 75 हजार रुपये किमतीचा अवैध फटाक्यांचा साठा जप्त केला असून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सराफा गल्ली, जुने ग्रामीण पोलीस ठाणे परिसर, एनटीसी हिंगोली येथे आरोपींच्या घरात आणि दुकानात ही कारवाई करण्यात आली.

 श्यामसुंदर हरीप्रसाद अग्रवाल, रा. सराफा गल्ली यांच्या शटर दुकानातून अंदाजे 80,000 रुपयांचे फटाके,  जतिन नितीन शाह, रा. सराफा गल्ली यांच्या दुकानातून अंदाजे 1,50,000 रुपयांचे फटाके,  सुनिल गोपालराव फटाले, रा. जुने ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ यांच्या राहत्या घरातून 20,000 रुपयांचे फटाके, नवनित गोपालराव फटाले, रा. जुने ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ यांच्या जुन्या घरातून 25,000 रुपयांचे फटाके अशा प्रकारे जुना माचिस, सुतळी बॉम्ब, सुरसुरी, फुलझडी, लसून फटाके, बिडी माचिससह विविध प्रकारचे एकूण 2,75,000 रुपयांचा अवैध फटाक्यांचा माल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना, बेकायदेशीररित्या नागरीकांच्या आरोग्यास व जिवाशी धोका होईल हे माहित असतानाही त्यांचे राहते घरात व दुकानात फटाके ताब्यात बाळगले म्हणून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 0777/2026 अन्वये कलम 287, 288 भारतीय न्याय संहिता 2023 सह कलम 9 ब (1) (ब) स्फोटक पदार्थ अधिनियम 1884 अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा मंडळ अधिकारी प्रदीप ज्ञानोबा इंगोले यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस देवेंद्र सिंह निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.व्ही. चिंतारे हे करीत आहेत.