कळमनुरी (Country Liquor Sale) : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात विनापरवाना देशी दारूची विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. देवासिंग अमरसिंग बावरी (वय 45 वर्षे, रा. इंदिरा नगर, दि. 23 जून 2026 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास नवीन बसस्थानकासमोर आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देशी दारू ‘भिंगरी संत्रा’ या ब्रँडच्या 90 एमएलच्या 50 सिलबंद प्लास्टिक बाटल्या विनापरवाना बाळगून त्यांची चोरटी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत आरोपीकडून प्रत्येकी 60 रुपये किमतीच्या 50 बाटल्या असा एकूण 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि जमीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिलीप पोले करीत आहेत.