सिहोरा फाट्याजवळ नाकाबंदीत कारवाई; २७.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
कन्हान (Kanhan cattle Illegal transport) : स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलि सांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गौवंशांची अवैध वाहतुक करणारा टाटा चा बारा चाकी ट्रक पकडला. ट्रकमध्ये एकुण २५ गौवंश अतिशय दाटीवाटीने आणि क्रूरतेने कोंबुन वाहतुक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामध्ये ८ गौवंशांचा गुदमरल्याने मृत्यु झाल्याचे पोलिसांनी नमुद केले आहे.
प्राप्त माहितीनुसार सोमवार (दि.२८) सप्टेंबर ला रात्री १०:४५ वाजता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल रामदास राऊत यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, गोंडेगाव रोड वरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ मार्गे नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच -३४-एबी-९३५८ क्रमांक चा टाटा चा बारा चाकी ट्रकमधुन गौवंशांची अवैध वाहतु क केली जात आहे. अश्या माहितीच्या आधारे पोलि सांनी पंचांना सोबत घेत कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिहोरा फाट्याजवळ नाकाबंदी केली.यावेळी संबंधित ट्रक पोलिसांना दिसताच चालकाने वाहन थांबवुन पळ काढला. (Kanhan cattle Illegal transport) पोलिसांनी चालकाचा पाठलाग केला, मात्र तो हाती लागला नाही.
पोलीसांनी पंचां समक्ष ट्रकची पाहणी केली असता मागील डाल्यात २५ गौवंश दाटीवाटीने व कुरतेने बांधलेल्या अवस्थेत आढळुन आले. त्यापैकी ८ जनावरांचा ट्रकमध्येच मृत्यु झाल्याचे आढळले. जिवंत जनावरांमध्ये १४ मोठे बैल व ३ छोटे गोन्हे, असे एकुण १७ गौवंश असल्याचे नमुद करण्यात आले. जिवंत गौवंशाची अंदाजे किंमत २ लाख ९५ हजार रुपये, तर ट्रकची अंदाजे किंमत २५ लाख रुपये आहे. पोलिसांनी एकुण २७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या (Kanhan cattle Illegal transport) प्रकरणी कन्हा न पोलीस ठाण्यात ट्रक चालक व मालक यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधिनियम १९९५ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांचा मार्गदर्शनात सपोनि स्नेहल राऊत, सपोनी विजय चन्नौरे, पोहवा उमेश फुलबेल, किशोर वानखेडे, रोहन डाखोरे,पोशि अमित मेहरे यांच्या सह इतर कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वि रित्या पार पाडली.