मुली अत्याचार प्रकरण

शिकवणीला गेलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

Girls Atrocities Case: १४ वर्षाचे मुलीचे नेटीकरण आणि अत्याचार, पोलिसाने १८ जुलै रोजी आरोपी मारुत सोहम ऐंगडेवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. घटना बरबडी येथे झाली.

शिकवणीला गेलेल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

Girls Atrocities Case

 

पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील घटना पिडितेच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल...!

परभणी (Girls Atrocities Case) :  पूर्णा तालुक्यात शिकवणीला गेलेल्या १४ वर्ष १० महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर शेतात नेत अत्याचार करण्यात आला. ही घटना १४ जुलै रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील बरबडी येथे घडली. पिडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर १८ जुलै रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, १४ जुलै रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बरबडी येथे शिकवणीला गेल्यावर आरोपीने त्या ठिकाणी जाऊन मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत तिला गाठले. त्यानंतर शिकवणी जवळ कॅनॉल रोड लगत असलेल्या एका ऊसाच्या शेतात पिडितेला ओढत नेले. या ठिकाणी बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. घडला प्रकार कोणाला सांगितल्यास तुला, तुझ्या भावाला आणि वडिलांना  मारुन टाकीण, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर धक्क्यात गेलेल्या मुलीने अखेर घडला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर १८ जुलै रोजी पूर्णा पोलिसात मारोती सोहम ऐंगडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोनि. पाटील करत आहेत. (ता.प्र.)

संबंधित सामग्री

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

Minor Girl Sexual assault: मुंबईला नातेवाईकाकडे गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मध्यंतरी मुलीची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रूग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती..

Aug 30, 2026
बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

बिस्कीट व पन्नास रुपयाचे आमिष दाखवून भोळसर मुलीवर सामुहीक अत्याचार

Girl Gang-rape: वसमत तालुक्यातील एका गावामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या वेडसर पणाचा फायदा घेऊन तिला बिस्किट व पन्नास रुपये देतो असे म्हणुन मोटार सायकलवर बसवून नेऊन तिच्यावर सामुहीक अत्याचार

Aug 20, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती केल्याने खळबळ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती केल्याने खळबळ

Minor Girls Atrocities: एक जिल्ह्यातील गावात ११ ऑगस्टला एका अल्पवयीन मुलीवर लिंगप्रति अत्याचार केल्याने गर्भवती करण्याच्या घटनेची खळबळ घडली.

Aug 12, 2026
छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामवर CSAM विक्रीचा पर्दाफाश; डार्कनेट कनेक्शनचा संशय

​​​​​​​छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार सायबर पोलिसांनी उघड केला आहे.

Aug 05, 2026
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता शाळा-कोलेजमध्ये शिकवले जाणार 'लैंगिक शिक्षण'

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता शाळा-कोलेजमध्ये शिकवले जाणार 'लैंगिक शिक्षण'

School Sex Education: केंद्र सरकार लवकरच देशातील शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण समाविष्ट करण्याच्या तयारीत, न्यायालयाच्या मंजुरीनंतर या उपक्रमाची अंमलबजावणी

Jul 15, 2026