कळमनुरी अवैध सावकारी प्रकरण

कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

Kalamnuri illegal money-lending case: महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अवैध सावकारी प्रकरणात कळमनुरी तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

Kalamnuri illegal money-lending case

हिंगोली (Kalamnuri illegal money-lending case) : महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अवैध सावकारी प्रकरणात कळमनुरी तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सहकार विभागाने  जिल्हा निबंधक सुरेखा फुफाटे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता शास्त्रीनगर, कळमनुरी येथील अवैध सावकारी प्रकरणातील किरण मुतक्या वंटनकर आणि श्रीमती कल्पना किरण वंटनकर यांच्या राहत्या घरावर घरझडती घेतली.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांच्या २८ सप्टेंबर रोजीच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. कार्यालय, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. कळमनुरी जि. हिंगोली यांच्यावतीने पथक प्रमुख बी. एम. बिरकुर, सहकार अधिकारी श्रेणी-१ यांनी दोन पंचांसमक्ष ही घरझडती केली. ज्ञानेश्वर शेषराव पतंगे, रा. कोंढूर आणि श्रीमती गंगासागर शालीकराम कांढूरे, रा. कळमनुरी यांच्या समक्ष घराची झडती घेण्यात आली. यावेळी घरात अवैध सावकारीशी संबंधित संशयास्पद कागदपत्रे आणि मुद्रांक (स्टॅम्प पेपर) आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये  १७ जुलै २०२६ चा दस्त क्र. ८८९/२०२६,  २० फेब्रुवारी २०२५ चे दस्त क्र. २८०१२/ २०२५ आणि २८०१३/ २०२५ तसेच १ जुलै २०२४ चा दस्त क्र. ५४८७/२०२४ यांचा समावेश आहे. या सर्व दस्तांमध्ये लिहून घेणारे म्हणून किरण मुतक्या वंटनकर यांचे नाव असून लिहून देणार्‍यांमध्ये ज्योती धनंजय वाघमारे, गंगाराम चोंडबा पाईकराव, मेहपती किसनराव पाईकराव आणि गजानंद सखाराम मोरे यांची नावे आहेत. हे सर्व व्यवहार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १५ व २९ चे उल्लंघन करणारे असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

सदरची कारवाई (Kalamnuri illegal money-lending case) सकाळी ८.३० ते ९.४५ या वेळेत पूर्ण करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जप्त केलेला मुद्देमाल आणि घरझडतीचा सविस्तर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांना सादर करण्यात आला आहे. या कारवाईत पथक प्रमुख बी. एम. बिरकुर, यांच्यासह यू. व्ही. चौंढीकर व्ही. वाय. ठाकरे तसेच बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी के. डी. गुंजकर आणि एस. बी. डोल्हारे यांनी सहभाग घेतला.