कन्हान गांजा तस्करी

स्थागुअ पोलिसांनी कार ने गांजा तस्करी करताना पकडुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kanhan Ganja Smuggling: नागपुर जबलपुर महामार्गावरील टेकाडी तार कंपनी जवळ कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा. पथकाने सापळा रचुन  महेंद्रा एक्स यु व्ही कार थांबवुन पाहणी

स्थागुअ पोलिसांनी कार ने गांजा तस्करी करताना पकडुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kanhan Ganja Smuggling

 

८ कि.८६८ ग्रा. गांजा १,७७,३४० रू. महिंद्रा कार, तीन फोन असा १२,०९,८४० रू.चा मुद्देमाल जप्त

कन्हान (Kanhan Ganja Smuggling) : नागपुर जबलपुर महामार्गावरील टेकाडी तार कंपनी जवळ कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा. पथकाने सापळा रचुन  महेंद्रा एक्स यु व्ही कार थांबवुन पाहणी करून गांजा तस्करी करताना पकडुन तीन आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विषयक कायद्यासह इतर संबंधित कायद्यांनुसा र गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार बुधवार (दि.९) सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथ क कन्हान परिसरात अवैध धंद्यांची माहिती घेण्यास व कारवाईकरिता फिरत असताना गुप्त माहिती मिळाली की, मनसर ते कन्हान रोडवरील परिसरात एका पांढ ऱ्या रंगाच्या यूपी-५७ बीपी- ७६१० क्रमांकाच्या वाह नातुन अमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी काही इसम येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळा ल्याने नागपुर जबलपुर महामार्गावरील टेकाडी तार कंपनी जवळ कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानि क गुन्हे शाखा ना. ग्रा. पथकाने सापळा रचुन महेंद्रा एक्स यु व्ही कार थांबवुन पाहणी केली.

त्यात ९ नग खाकी रंगाचे प्लास्टिक वेष्ठानात गुंडाळून मिळाले ले निव्वळ हिरव्या रंगाचे पाने, काडी, देढ, असलेले ओलसर अमली पदार्थ गांजा वजन ८ किलो ८६८ ग्राम किंमत १,७७,३४० रु च्या मुद्देमाल, एक महिंद्रा एक्स यु व्ही कंपनीचे वाहन क्र. युपी ५७ बीपी ७६१० किंमत १०,००,००० रु. आणि आरोपींकडुन नगदी २५०० रू, तीन मोबाईल ३२५०० रु असा एकुण १२,०९,८४० रु. चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून आरोपी १)कन्हैया उर्फ ​​शुभम कांपिलदेव शाही वय ३२ वर्ष, रा. गुरुव्दारा समोर टेकाडी त. पारशिवनी जि. नागपुर, २) हिमांशु नंदलाल शर्मा वय २५ वर्ष रा. दिघेडा पो. अरसुपुर त. मधुबन जि. महु उत्तरप्रदेश, ३) सूरज राजेंद्र चव्हाण वय ३२ वर्ष रा. ताडी पो. धरमपुर बिसनपुर त. मधुबन जि. महु उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेऊन याचे विरूध्द कन्हान पोस्टे ला कलम ८(अ), २० (ब) (१) (ब), २९ एन.डी.पी.एस. अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. 

सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेयश शाखा नागपुर ग्रामिण पथक सहा. पोलीस निरीक्षक विजय चनोर यांच्या मार्गदर्शनात पो. हवा प्रमोद भोयर, संजय बान्ते, सत्येद्र कोठारे, किशोर वानखेडे, पोना संजय बरोदिया, पोशि सम्राट वनपती तसेच एनडीपीएस पथकातील पोहवा प्रविण देवारे, प्रकाश ढोके, पोहवा अमोल नागरे, पोहवा अमृत किनंगे, पोशि अनिल खरड किल्हे, चापोशि अविनाश तोडसाम आदीनी यशस्विरित्या पार पाडली.

टैग्स: Kanhan Ganja Smuggling