लातूर स्थानिक गुन्हे शाखा

आंतरराज्य सराईत गुन्हेगार राहुल बादल बंजारा लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात! 

Latur Crime Branch: बोथी रोड, पोस्ट ऑफिसजवळ राहणाऱ्या कल्पना नंदकुमार आक्कानवरु (वय ५०) यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याच्या प्रकरण

आंतरराज्य सराईत गुन्हेगार राहुल बादल बंजारा लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात! 

Latur Crime Branch

चाकूर (Latur Crime Branch) : शहरातील बोथी रोड, पोस्ट ऑफिसजवळ राहणाऱ्या कल्पना नंदकुमार आक्कानवरु (वय ५०) यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून . या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी राहुल बादल बंजारा ऊर्फ पंडितसिंग धरमसिंग जुन्नी हा सराईत आंतरराज्यीय गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे.

चाकूर पोलीस ठाण्यात (Latur Crime Branch) गुन्हा क्रमांक ४६९/२०२६, कलम ३०९(४), ३(५) भारतीय न्याय संहितेनुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी नवीन रेणापूर नाका, लातूर येथील आप्पा पान शॉपसमोर सापळा रचून होंडा शाईन मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल बादल बंजारा ऊर्फ पंडितसिंग धरमसिंग जुन्नी (वय ५३, रा. इंदिरा कॉलनी, भादरलाऊ, जि. पाली, राजस्थान, ह.मु. शिवाजी चौक, परळी वैजनाथ, जि. बीड) आणि बच्चनसिंग मंगलसिंग बावरी (वय ४५, रा. नागसेन नगर, परळी वैजनाथ, जि. बीड) यांचा समावेश आहे.

आरोपी राहुल याच्या अंगझडतीत काळ्या रंगाच्या कव्हरमध्ये ठेवलेला धारदार लोखंडी चाकू तसेच चोरीतील सोन्याचे दागिने आढळून आले. चौकशीत त्याने साथीदार जगजितसिंग अचोलसिंग दुधानी यांच्या मदतीने चाकूर येथे महिलेला चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, धारदार लोखंडी चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक एमएच-२६-एवाय-४३४९ असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुख्य आरोपी राहुल बादल बंजारा याच्याविरुद्ध महाराष्ट्रात ६८, राजस्थानमध्ये ११, गुजरातमध्ये २० आणि कर्नाटकात २ असे एकूण १०१ गुन्हे पोलीस अभिलेखावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घरफोडी, चोरी, जबरी चोरी, दरोडा, दरोड्याची तयारी, प्राणघातक हल्ला, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, गुन्हेगारी कट आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. या (Latur Crime Branch) प्रकरणातील तिसरा आरोपी जगजितसिंग अचोलसिंग दुधानी हा फरार असून, त्याचा तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुसऱ्या मोटारसायकलचा शोध सुरू आहे.

कारवाईतील पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुराब पठाण, विनोद चलवाड, रामलिंग शिंदे, राजेश कंचे, पाराजी पुठेवाड, तुळशीराम बरुरे, गोविंद अंगद येलमटे, प्रेमदास राठोड, मनोज खोसे, आनंद हल्लाळे, हरी पतंगे आणि श्रीनिवास जांभळे यांचा समावेश आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026
हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026