कळमनुरी गुटखा-तंबाखू जप्त

कळमनुरीत ५.६९ लाखांचा गुटखा-तंबाखू जप्त; एकाविरुद्ध गुन्हा

Kalamnuri Gutkha-Tobacco seized: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा व तंबाखूची अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा

कळमनुरीत ५.६९ लाखांचा गुटखा-तंबाखू जप्त; एकाविरुद्ध गुन्हा

Kalamnuri Gutkha-Tobacco seized

कळमनुरी (Kalamnuri Gutkha-Tobacco seized) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा व तंबाखूची अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी कारसह तब्बल ५ लाख ६९ हजार ८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर विठ्ठलराव श्रीरामे (वय ३२, रा. पिंपळदरी, ता. जि. हिंगोली) हा १६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता मसोड गावाकडे जाणाऱ्या फाट्याजवळ, बिट क्रमांक ४ मध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखू कारमधून घेऊन जात असताना आढळून आला.

पोलिसांनी एमएच ३२ सी २९४० क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार ताब्यात घेतली. कारमध्ये पांढऱ्या रंगाच्या बोऱ्यांमध्ये विमल पान मसाल्याचे छोटे व मोठे पुडे तसेच व्ही-१ तंबाखूचे छोटे व मोठे पाऊच आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ६९ हजार ८२ रुपये, तर कारची अंदाजे किंमत ५ लाख रुपये, अशी एकूण ५ लाख ६९ हजार ८२ रुपये आहे.

या (Kalamnuri Gutkha-Tobacco seized) प्रकरणी फिर्यादी पोलीस नाईक सतीश उत्तमराव जाधव यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास आडे करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026
अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्जाचा आरोप; दीपक वागसकर यांच्या मृत्यूनंतर तणाव. कार्यकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

Sep 24, 2026