ट्रक चालक मृत्यू

गुळ घेऊन नागपूरला जाणार्‍या ट्रक चालकाचा ठाणा गावाजवळ संशयास्पद मृत्यू!

Truck Driver Death: गोंदिया-आमगाव रस्त्यावर ठाणा गावाच्या शिवारात एका ट्रक चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळला. चालकाच्या शरीरावर गंभीर जखमांमुळे आत्महत्येचा possibility नाही

गुळ घेऊन नागपूरला जाणार्‍या ट्रक चालकाचा ठाणा गावाजवळ संशयास्पद मृत्यू!

Truck Driver Death

गोंदियात खळबळ: मृतदेहावर जखमा आणि रक्ताचे थारोळे

घातपाताची दाट शक्यता; आमगाव पोलिसांकडून तपास सुरू

आमगाव/ गोंदिया (Truck Driver Death) : गोंदिया-आमगाव रस्त्यावरील ठाणा गावाच्या शिवारात एका ट्रक चालकाचा अत्यंत संशयास्पद रित्या गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृत चालकाच्या शरीरावर आणि पायावर गंभीर जखमा असून घटनास्थळी रक्ताचे थारोळे दिसून आले आहे. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार नसून, घातपात (खून) असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केशव उके (वय २५ वर्षे, रा.बारबती, जिल्हा शिवनी, मध्यप्रदेश) असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे.

सविस्तर असे की, आमगाव-गोंदिया रोडवरील ठाणा गावाच्या परिसरात एक ट्रक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकाच जागेवर संशयास्पद (Truck Driver Death) स्थितीत उभा होता. ट्रकमधून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांना संशय आला. त्यांनी ट्रकमध्ये डोकावून पाहिले असता, चालकाचा मृतदेह ट्रकच्या दोरीला बांधलेल्या आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकताना दिसून आला. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीकरीता शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, या गुंतागुंतीच्या प्रकरणात फॉरेन्सिक टीमचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. हा (Truck Driver Death) घातपाताचा गुन्हा आहे की आणखी काही, या दृष्टीने आमगाव पोलिस आता वेगवेगळ्या कोनातून कसून तपास करत आहेत. प्राथमिक तपासाअंती आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आत्महत्या की खून? पोलिसांसमोर प्रश्न!

वरकरणी हा आत्महत्येचा मामला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असला, तरी घटनास्थळावरील परिस्थिती वेगळाच इशारा करत आहे. मृत केशवच्या पायावर, गळ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमांच्या खुणा आहेत. सामान्यतः गळफास घेतलेल्या घटनेत इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत नाही, मात्र घटनास्थळी मृतदेहाच्या खाली रक्ताचे थारोळे साचले होते. मृतदेह दोन ते तीन दिवस जुना असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

नागपूरचा ट्रक गोंदियात कसा आला?

या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा पेच हा आहे की, संबंधित चालक ट्रकमध्ये गुळ भरून तो नागपूर येथे खाली करण्यासाठी निघाला होता. मग नागपूरला जाणारा ट्रक अचानक मार्ग बदलून गोंदिया जवळील आमगाव परिसरात कसा काय पोहोचला? त्याचे कोणाशी काही भांडण झाले होते का? की चालकाचे अपहरण (Truck Driver Death) करून त्याला या निर्जन स्थळी आणून संपवण्यात आले? असे अनेक अनुत्तरीत प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026