परभणी मंगळसूत्र चोरी

दिवसा ढवळ्या ज्येष्ठ महिलेचा मंगळसूत्र हिसकावला; नानलपेट हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

Parbhani mangalsutra stolen: परभणीत, नानलपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेचा मंगळसूत्र हिसकावला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

Parbhani mangalsutra stolen

पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

परभणी () : शहरातील नानलपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. 29) सकाळी साडेआठच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवर येत ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. या (Parbhani mangalsutra stolen) घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

परभणी शहरातील त्रिमूर्ती नगर परिसरातील आनंद प्रोव्हिजनजवळ राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेला गाठून क्षणार्धात मंगळसूत्र हिसकावले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, या प्रकरणी अधिकृत माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचे समोर आले आहे. नानलपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वीही अशा (Parbhani mangalsutra stolen) प्रकारच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वारंवार घडणाऱ्या चोऱ्या आणि हिसकावण्याच्या घटनांमुळे पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी या प्रकारांवर तातडीने अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
प्राथमिक आरोग्य केंद्रा सामोरील ग्रीन जिम येथे स्वच्छता

प्राथमिक आरोग्य केंद्रा सामोरील ग्रीन जिम येथे स्वच्छता

Senior Citizens Association:  स्वच्छ व प्रदुषण मुक्त कन्हान शहर या उदात्त हेतुने जेष्ठ नागरिक संघ व जागृती जेष्ठ नागरिक संघटना आणि नगरपरिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्य माने प्राथमिक आरोग्य केंद्र..

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026