परभणी पिस्तूल जप्त

परभणीत कंबरेला पिस्तूल लावून फिरणार्‍याला घेतले ताब्यात

Parbhani pistol seized: परभणी पोलिसांनी कुर्बान अली शाह नगरात एक व्यक्तीना पिस्तूल लावून फिरण्याच्या आरोपाने पकडले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीत कंबरेला पिस्तूल लावून फिरणार्‍याला घेतले ताब्यात

Parbhani pistol seized

 

परभणी शहरातील कुर्बान अली शाह नगरात स्थागुशाची कारवाई

परभणी (Parbhani pistol seized) : कंबरेला पिस्तूल लावून फिरणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. परभणी शहरातील कुर्बान अली शाह नगरात कारवाई करण्यात आली. संबंधिताजवळून पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि मोबाईल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ३१ मे रोजी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थागुशाचे पोउपनि. चंदनसिंह परिहार, सपोउपनि. मधूकर चट्टे, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, पोलीस अंमलदार सय्यद उमर, जमीर फारुकी, महेशकुमार पांगरकर, शेख रफिक, प्रमोद पुरी, गजानन क्षिरसागर, हनवते यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत  होते. या पथकाला कुर्बान अली शाह नगर भागात एक इसम कंबरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी शेख मुज्जमील याला ताब्यात घेतले. (Parbhani pistol seized) त्याची झडती घेतली असता संबंधिता जवळ पिस्तूल मिळून आले. तसेच त्याच्या जवळ एक जिवंत काडतूस देखील होते. अधिक चौकशी केल्यावर संबंधिताने पिस्तूल कुठून आणले याची माहिती सांगितली. या प्रकरणी सपोउपनि. सुग्रीव केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन शेख मुज्जमील, शेख रहिम उर्फ शेरा, खय्युम बेग, पुनम यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026