परभणी ट्रॅव्हल्स-दुचाकी अपघात

परभणीत ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; चार तरुणांचा मृत्यू

Parbhani Travel-Bike Accident: परभणी महसुलातील चार तरुणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग ६१वर एन.एल. ०१ बी. १३७४ क्रमांकाची ट्राव्हल्सने दुचाकीला धडक दिली. मृतदेह वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

परभणीत ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; चार तरुणांचा मृत्यू

Parbhani Travel-Bike Accident

 

राष्ट्रीय महामार्ग ६१ वर मानवत येथील राहुल जिनिंग समोर अपघात

परभणी (Parbhani Travel-Bike Accident) : परभणीकडून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव वेगातील खाजगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात मानवत येथील चार तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग ६१ वर राहुल जिनिंग समोर शुक्रवार २९ मे रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी ट्रॅव्हल्स चालका विरोधात मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या (Parbhani Travel-Bike Accident) अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, परभणीहुन एन.एल. ०१ बी. १३७४ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स पुण्याकडे जात होती. मानवत जवळ अंधारवड मारोती मंदिराच्या कमानी समोर या ट्रॅव्हल्सने एम.एच. २२ बी.बी. ४७२४ या क्रमांकाच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील प्रल्हाद अशोक कुटे वय २७ वर्ष, विष्णू गोरे वय २६ वर्ष, नवनाथ जाधव वय ३० वर्ष, शुभम दहे वय २७ वर्ष या तरुणांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच सपोनि. संदीप बोरकर, पोउपनि. किशन पतंगे, प्रमोद देवकते, ज्ञानेश्वर चोपडे, सय्यद फयाज यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. शनिवार ३० मे रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास मानवत येथील वैकुंठधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच गावातील चार तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026