पत्नीची निर्घृण हत्या

परभणीत चारठाणा हादरले; चरित्राच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Charthana Brutal Murder: परभणीत पत्नीच्या चरित्रावर संशयातून पतीने काठी व दगडाने निर्घृण हत्या केली. पोलिस ठाण्यात कबुली दिल्यानंतर पुढील तपास सुरू.

परभणीत चारठाणा हादरले; चरित्राच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Charthana Brutal Murder

 

हत्या करून पती थेट पोलिस ठाण्यात...!

परभणी (Charthana Brutal Murder) : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे पत्नीच्या चरित्रावर संशय घेत पतीनेच पत्नीची काठीने मारहाण करून डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे चारठाणा परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित्रा श्रीधर गायकवाड (वय ३८, रा. चारठाणा ता. जिंतूर) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपी पती श्रीधर गायकवाड याने आपल्या पत्नीला दुचाकीवर बसवून गावालगत असलेल्या जिंतूर–जालना महामार्गावरील शेतातील आखाड्यावरील निवार्‍याकडे नेले. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने प्रथम पत्नीला काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर संतापाच्या भरात तिच्या डोक्यात मोठा दगड घालून तिची (Charthana Brutal Murder) हत्या केली.

या (Charthana Brutal Murder) अमानुष हल्ल्यात सुमित्रा गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी श्रीधर गायकवाड स्वतः चारठाणा पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, बीट जमादार उद्धव माने, उद्धव सातपुते, गुप्तचर विभागाचे उमेश बारहाते यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, (Charthana Brutal Murder) पत्नीच्या चरित्रावर संशय घेतल्यामुळे हा खून झाल्याचे समोर येत असून या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026